उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्रीकृष्ण प्रसन्ना वेंकटापूर ही या पिढीतील एक आहे !

| ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला भाग्यनगर (तेलंगाणा) येथील चि. श्रीकृष्ण वेंकटापूर याची त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !
चि. श्रीकृष्ण वेंकटापूर याची त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी

अ. ‘मला गर्भारपणात स्वप्नात पुष्कळ वेळा सनातनच्या तिन्ही गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) दर्शन होत होते.
आ. माझे मन पुष्कळ शांत असायचे. माझा मधून मधून आपोआप भाव जागृत होत असे.’
– सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी वेंकटापूर (चि. श्रीकृष्णाची आई), भाग्यनगर, तेलंगाणा.
२. वय ३ मास ते ६ मास
अ. ‘श्रीकृष्ण ६ मासांचा होईपर्यंत पुष्कळ लोकांना त्याचे नाव ठाऊक नव्हते, तरीही ते ‘हा श्रीकृष्णासारखा दिसतो’, असे सांगत असत.
आ. श्रीकृष्ण ३ मासांचा झाल्यावर माझ्या आजीला (आताच्या पू. (कै.) श्रीमती आंडाळ आरावल्ली चिराला यांना) संत घोषित केले, तसेच माझ्या मामाची (श्री. श्री बदरी नारायण आरवल्ली चिराला, वय ५३ वर्षे यांची) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले.’
– सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी वेंकटापूर
३. वय ६ मास ते १ वर्ष

अ. ‘श्रीकृष्णाच्या जन्मानंतर काही मासांनी सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरानिमित्त गेली होती. त्या वेळी आम्हीही तिच्या समवेत गेलो होतो. तेव्हा आम्हाला आश्रमात एक संत भेटले. त्या वेळी श्रीकृष्ण त्यांच्या शेजारी झोपत असे आणि त्यांना नमस्कार करत असे.
आ. सौ. श्रीवैष्णवी तेजस्वीचे वडील किंवा मी देवपूजा करत असतांना श्रीकृष्ण घरात कोठेही असला, तरीही तो देवघरात येतो. मी आरती करत असतांना श्रीकृष्ण टाळी वाजवून आरतीचा आनंद घेत असे. एक दिवस तेजस्वीचे वडील देवपूजा करत असतांना श्रीकृष्ण घंटा वाजवण्यासाठी आणि नैवेद्य ठेवण्यासाठी हाताने खुणा करत होता.
इ. आम्ही श्रीकृष्णाचा अन्नप्राशन विधी करण्यासाठी तेजस्वीच्या आजीच्या (आताच्या पू. (कै.) श्रीमती आंडाळ आरावल्ली चिराला यांच्या) घरी गेलो होतो. तेव्हा श्रीकृष्णाने पू. आजींना पुष्कळ वेळा नमस्कार केला.’
– श्री. प्रसन्ना वेंकटापूर
ई. ‘श्रीकृष्ण ११ मासांचा असतांना आम्ही श्रीकृष्णाचे जावळ काढण्यासाठी त्याला माझ्या आजीच्या घरी घेऊन जात होतो. तेव्हा यशोदेचे एक भक्तीगीत ऐकून ‘माझ्या पोटी साक्षात् श्रीकृष्णानेच जन्म घेतला आहे’, असे वाटून पुष्कळ वेळपर्यंत माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.
उ. श्रीकृष्ण १ वर्षाचा असतांना एकदा तो फुलांशी खेळत होता. त्या वेळी ‘त्याच्या समवेत काही दैवी प्रक्रिया होत आहे आणि त्याच्यावर पुष्पवृष्टी होत आहे’, असे मला जाणवले. काही वेळाने मला त्याच्या शरिरावर दैवी कण दिसले.’
– सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी वेंकटापूर, भाग्यनगर, तेलंगाणा.
४. वय १ वर्षानंतर
अ. ‘सौ. श्रीवैष्णवी तेजस्वीचे वडील देवपूजा करत असतांना श्लोक म्हणतात. तेव्हा श्रीकृष्णही त्यांचे अनुकरण करत ॐ उच्चारण्याचा प्रयत्न करतो.
आ. मी अग्निहोत्र करतांना ‘ॐ ॐ श्री अग्निदेवाय नमः ।’ असे म्हणतो. तेव्हा श्रीकृष्णही तसे म्हणण्याचा प्रयत्न करतो.
– श्री. प्रसन्ना वेंकटापूर, भाग्यनगर, तेलंगाणा.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २१.१०.२०२४)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील सनातनचे साधक श्री. प्रसन्ना वेंकटापूर आणि त्यांची पत्नी सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी प्रसन्ना वेंकटापूर यांचा दुसरा पुत्र चि. श्रीकृष्ण वेंकटापूर (वय २ वर्षे ५ मास) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी २५ डिसेंबर २०२५ या दिवशी घोषित केले. यानिमित्त सनातनच्या तेलंगाणाच्या जिल्हासेविका सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी त्याचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.
२५ डिसेंबर या दिवशी भाग्यनगर सेवाकेंद्रामध्ये स्थानिक साधक आणि साधना सत्संगातील जिज्ञासू यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तेलंगाणाच्या जिल्हासेविका सौ. मीना कदम यांनी ‘साधना आणि सत्संग यांचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्संगाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘ऑनलाईन’ उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी ‘साधना करतांना आपण आपल्या घरातील सदस्य किंवा लहान मुले यांच्याकडून काय शिकतो ?’, असा प्रश्न विचारला, तेव्हा सत्संगाला उपस्थित सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी प्रसन्ना वेंकटापूर यांनी चि. श्रीकृष्णाविषयी त्यांना जाणवलेली सूत्रे सांगितली. त्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी चि. श्रीकृष्णाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे सांगितले आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले. ही वार्ता ऐकताच चि. श्रीकृष्ण याचे आई-वडील आणि उपस्थित साधक यांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीकृष्णाचे वडील आणि आई यांनी व्यक्त केलेले मनोगत
या वेळी मनोगत व्यक्त करतांना श्रीकृष्णाचे वडील श्री. प्रसन्ना वेंकटापूर म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाने आध्यात्मिक पातळी प्राप्त करण्यामध्ये आमचे कोणतेही योगदान नाही. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे घडले आहे. मुलांना गुरूंच्या चरणी नेणे, हेच आमचे एकमेव कर्तव्य आहे. ‘गुरुदेवच या मुलांकडून त्यांना अपेक्षित असलेले कार्य करवून घेतील’, असा आम्हाला विश्वास आहे.’’ चि. श्रीकृष्णाची आई सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी प्रसन्ना वेंकटापूर कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी अशा मुलांना जन्म देण्यास आम्हाला पात्र समजले, त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. आता आमचे दायित्व अधिक वाढले आहे.’’
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !