‘१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. ‘शंखनाद करत असलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र’, हे या कार्यक्रमाचे बोधचिन्ह होते. भगवान श्रीकृष्णाकडे ‘पांचजन्य’ नावाचा शंख आहे, तसेच पंचतत्त्वे ही भगवान श्रीविष्णूची अपरा शक्ती आहे. गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात’ही पंचतत्त्वांच्या स्तरांवर सूक्ष्म शंखनाद करण्यात आला, म्हणजेच पंचतत्त्वांपैकी त्या-त्या तत्त्वाशी निगडित माध्यमाद्वारे समाजात सात्त्विकता प्रक्षेपित करण्यात आली. याचे विश्लेषण पुढे देत आहे.

१. शंखनादाच्या सात्त्विक ध्वनीमुळे आध्यात्मिक स्तरावर सात्त्विकता आणि चैतन्य प्रक्षेपित होऊन व्यक्ती अन् स्थान यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होणे आणि कार्यात यश मिळण्याचे प्रमाण वाढणे
हिंदु धर्मात व्यक्ती किंवा समूह करत असलेल्या कार्याचा शुभारंभ होण्यासाठी शंखनाद करण्याची परंपरा आहे. यामागील शास्त्र असे की, शंखनादाच्या सात्त्विक ध्वनीमुळे आध्यात्मिक स्तरावर सात्त्विकता आणि चैतन्य प्रक्षेपित होऊन व्यक्ती अन् स्थान यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होते. यामुळे कार्यात यश मिळण्याचे प्रमाण वाढते.
२. साधकांनी विविध कृतींतून सात्त्विकतेचे प्रगटीकरण केल्यावर त्याचा परिणाम सर्व समष्टीवर होणे

जवळ ठेवलेल्या दोन वीणांपैकी एका विणेची तार छेडल्यावर दुसर्या विणेच्या तारेचे कंपन होते. याला वैज्ञानिक भाषेत ‘अनुनाद (Resonance)’ आणि ‘अनुनादी कंपन (Sympathetic Vibration)’ म्हणतात. त्याप्रमाणेच साधना करणार्या एका जिवाने पुष्कळ प्रयत्न करून स्थुलातील कृतीद्वारे सात्त्विकतेचे प्रगटीकरण केले, तर तशाच कृती करणार्या इतर जिवांवरही त्याचा सूक्ष्म परिणाम होऊन त्यांच्यातही काही अंश का होईना; पण सात्त्विकतेची निर्मिती होते. यालाच ‘त्या इतर व्यक्तींमधील किंवा त्या क्षेत्रातील शंखनाद’, असेही म्हणू शकतो.
या अनुषंगाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात पंचतत्त्वांच्या स्तरावर केल्या गेलेल्या विविध कृती आणि त्या माध्यमातून झालेले शंखनाद यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.
२ अ. पंचतत्त्वे, पंचतत्त्वांच्या प्रगटीकरणाचे माध्यम, सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील प्रत्यक्ष कृती आणि तिच्याद्वारे झालेले शंखनादाचे स्वरूप

३. कृतज्ञता
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’, म्हणजे भूतलावर गंगेचे अवतरण. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रगटीकरणामुळे सूक्ष्म स्तरावर भगिरथाच्या अडकलेल्या अनेक पूर्वजांना गती मिळाली, तर स्थूल स्तरावर भारत भूमी सुजलाम् (जलाने समृद्ध), सुफलाम् (फळे आणि अन्नधान्ये यांनी समृद्ध) आणि मलयजशीतलाम् (मलय पर्वतातून येणार्या चंदन सुगंधित थंड वार्याने युक्त) होण्यासाठी साहाय्य झाले, त्याचप्रमाणे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे सूक्ष्म स्तरावर व्यापक स्तरापर्यंत सात्त्विकतेचे प्र्रक्षेपण झाले, तर स्थूल स्तरावर हिंदु समाजाचे संघटन होऊन राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि सनातन राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती मिळाली. या शब्दातीत कार्यक्रमाच्या संदर्भात दोन शब्द लिहिता आले; म्हणून मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो !
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १९.९.२०२५, वेळ रात्री ८.१० आणि एकूण कालावधी १ मिनिट)
|
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता