‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे त्या भारतातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी प्रार्थना आणि पूजादी विधी करतात. अनेक संतांनीही अध्यात्मप्रसारासाठी भ्रमण केले आहे.

१. अनेक संतांनी केलेला ‘दैवी दौरा’ !
अ. ‘दैवी प्रवासाची ही परंपरा आद्य शंकराचार्यांपासून चालू आहे. त्यांनी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्या वेळी सर्वत्र भ्रमण करून सनातन हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. भारत देशात ४ दिशेला ४ मुख्य वेदपिठांची स्थापना करून ‘सनातन हिंदु धर्माला’ नवचैतन्य दिले.
आ. संत ज्ञानेश्वरांनीही लोकांना भक्तीमार्गाची आणि भागवत धर्माची शिकवण देण्यासाठी महाराष्ट्रात भ्रमण केले, तसेच लोकांना समजेल अशा भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली.
इ. संत मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या परम भक्त होत्या. त्यांनी राजवाडा सोडला आणि संपूर्ण उत्तर भारतात भ्रमण करून भजनांमधून अध्यात्माचा संदेश लोकांपर्यंत पोचवला.
ई. समर्थांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला. त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण करून धर्मरक्षण आणि राष्ट्र-उभारणी यांसंदर्भात मोठे कार्य केले.
२. प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तांच्या उद्धारासाठी केलेले भ्रमण
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या या प्रवासाचा मूळ ऊर्जास्रोत सनातन संस्थेचे प्रेरणास्थान ‘प.पू. भक्तराज महाराज’ हे आहेत. ‘त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भ्रमण करून रात्रंदिवस कष्ट घेऊन परात्पर गुरुदेवांच्या कार्यासाठी आणि या दौर्यासाठी मार्ग मोकळा केला’, असे वाटते. प.पू. बाबांनी त्या वेळी फारशा सोयीसुविधा उपलब्ध नसतांना केलेल्या भ्रमणाविषयी आपण विचारही करू शकत नाही. प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तांच्या उद्धारासाठी ‘भजन, भ्रमण आणि भंडारा’ ही ‘त्रिसूत्री’ अवलंबली.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या दैवी दौर्याची महती !
‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ करत असलेल्या ‘दैवी’ दौर्यात सेवेची सुवर्णसंधी मिळावी’, यासाठी अनेक साधक, संत आणि त्यांच्या माध्यमातून देवताही उत्सुक असतात’, असे वाटते.
सनातन संस्थेचे अनेक संत आणि साधक श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगतात, ‘‘आम्हालाही तुमच्या समवेत ‘दैवी’ दौर्याला यावे’, असे वाटते.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले हेही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगतात, ‘‘माझी प्रकृती चांगली असती, तर मीही तुमच्या समवेत दौर्यावर नक्कीच आलो असतो.’’ त्यांचे असे म्हणणे हे दौर्याच्या सेवेचे महत्त्व लक्षात आणून देते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेला दैवी दौरा !
४ अ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा ‘हे विश्वची माझे घर ।’ असा भाव ! : पूर्वी ज्या व्यक्तींनी ‘ईश्वरी’ कार्याची पताका समाजात फडकवली, त्यांना त्यांचे स्वत:चे असे घर नव्हते. त्यांनी ‘हे विश्वची माझे घर ।’ हीच संकल्पना आनंदाने अंगीकारली. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणतात, ‘‘रस्ता हेच आमचे घर. ‘प्रवास हेच आमचे जीवन आहे. आम्ही सार्या पृथ्वीलाच ‘घर’ बनवायला निघालो आहोत !’’
४ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या दैवी दौर्याची व्यापकता ! : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने चालू असलेल्या या दौर्याच्या माध्यमातून होणारे ‘ईश्वरी कार्य’ हे ‘सगुण आणि निर्गुण’ या दोन्ही स्तरांवरील आहे. हा प्रवास मानवाने करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहे.
४ इ. ‘गुरुदेवांचा संकल्प आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चैतन्य’ यांच्या बळावर हा दैवी दौरा चालू असणे आणि पुष्कळ प्रवास अन् सेवा करूनही साधकांना थकवा येत नसणे : मौजमजा करण्यासाठी २ दिवस सहलीसाठी गेलेल्या व्यक्तींनाही थकवा येतो आणि त्यांना ‘पुन्हा घरी कधी जाऊ ?’, असे होते. यातून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दौर्याचे वैशिष्ट्य लक्षात येते. तेव्हा ‘भगवंताच्या कार्यासाठी भगवंतच प्रवास करत आहे !’, असे जाणवते. ‘गुरुदेवांचा संकल्प आणि शक्तीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चैतन्य’ यांच्या बळावर हा दैवी दौरा चालू आहे. त्यामुळे एवढा प्रवास आणि सेवा करूनही एकही साधक कधीच थकलेला दिसत नाही.
४ ई. ‘स्त्री म्हणून एवढा प्रवास कसा करायचा ?’, असा विचार श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या मनात कधीही आला नाही.
५. ‘अमरनाथ’ आणि ‘कैलास मानस सरोवर’ यात्रा पूर्ण करून आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दौर्यावरील साधकांचे केलेले कौतुक !
आम्ही सर्व जण ‘अमरनाथ’ आणि ‘कैलास मानस सरोवरची’ अवघड यात्रा निर्विघ्नपणे पूर्ण करून आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आमचे (श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे), श्री. सत्यकाम कणगलेकर, श्री. स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे) यांचे) कौतुक केले. आम्ही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले, ‘‘केवळ परात्पर गुरुदेव आणि आपण दोघी (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ) यांच्या कृपेमुळेच या दोन्ही दुर्लभ यात्रा होऊ शकल्या.’’
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही त्यांनी ही यात्रा केली. ‘त्यांचा आध्यात्मिक अधिकार आणि त्यांची चैतन्यशक्ती’ या बळावर त्यांनी ही यात्रा सहजतेने केली; मात्र तुम्हा सर्वांचे तसे नाही, तरीही तुम्ही हा खडतर प्रवास आणि या यात्रांच्या संदर्भातील सेवा पूर्ण केली, हे कौतुकास्पद आहे !’’
‘या सेवेच्या माध्यमातून आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सत्संग लाभला’, याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता ! परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी आम्ही दौर्यातील सर्व साधक कृतज्ञतापूर्वक कोटीशः नमस्कार करतो.’
एक साधक
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !