‘एम्.आय.एम्.’चे नेते वारिस पठाण यांची मुक्ताफळे !

मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मुंबईचा महापौर मराठीच होईल’, असे सांगितले होते. आता ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघा’चे) नेते वारीस पठाण यांनी प्रश्न विचारला, ‘‘मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद आणि अन्सारी का होऊ शकत नाही ?’’ (पाकिस्तानात जसे महापौर किंवा मंत्री हे मुसलमानच होतात, त्यानुसार महाराष्ट्र अथवा भारतात हिंदु महापौर किंवा मंत्री झाले, तर त्यात वावगे काय ? – संपादक) एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे विधान केले.
वारीस पठाण म्हणाले की, राज्यघटनेत समानता आहे ना ? सर्वांना बरोबरीचा दर्जा हवा. ठाकरे बंधूंना काही माहितीच नाही. त्यांचे एकच काम आहे, ते म्हणजे देशात द्वेष पसरवणे, मतांचे ध्रुवीकरण करणे आणि मुसलमानांना कोणत्याही पद्धतीने शिवीगाळ करणे. ( धर्मांध मुसलमान भारतात धार्मिक दंगली, बाँबस्फोट, लव्ह जिहाद, भूमी जिहाद करत आहेत. इस्लामी राज्य आणण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न सूज्ञ जनता जाणून आहे. असे असतांना धर्मांधांच्या या कृत्यांविषयी वारिस पठाण मूग गिळून गप्प का ? हिंदूंवर धर्मांधांकडून वरील आघात होत असतांना पठाण यांना राज्यघटना का आठवत नाही ? – संपादक)
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed