|

केंद्रापाडा (ओडिशा) – येथे फरीदा नावाच्या एका मुसलमान महिलेनेच तिचा पती सैजुद्दीन खान याने केलेला लव्ह जिहाद उघड केला आहे. या प्रकरणी तिने पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘माझा पती सैजुद्दीन खान हा अविवाहित असल्याचे सांगून हिंदु तरुणींना फसवत होता, तसेच त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर विवाहासाठी दबाव आणत होता. काही मुसलमान संघटनांकडून एखाद्या हिंदु युवतीशी विवाह केल्यास अनुमाने १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते.’
🚨 Love Jihad Network Unmasked 🚨
Kendrapara, Odisha: After deceiving a Hindu girl, the accused reportedly received ₹10 lakh from Muslim organisations.
Shocking twist: his own Muslim wife exposed his ‘love jihad’ activities.
🔍 Total funding revealed: ₹20+ lakh
⚠️ Hindus… pic.twitter.com/IoJdXNef9Q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 26, 2025
फरीदा हिने तक्रारीत पुढे म्हटले आहे, ‘माझा आणि सैजुद्दीन यांचा विवाह वर्ष २०२० मध्ये झाला असून आम्हाला एक मूलही आहे. मूल झाल्यानंतर २ वर्षांनी सैजुद्दीनने मला सोडून दिले. त्यानंतर त्याने अविवाहित असल्याचे सांगून एका हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी बलपूर्वक संबंध ठेवले आणि नंतर विवाह केला. सैजुद्दीन याने काही काळानंतर आणखी एका मुसलमान महिलेशीही विवाह केला. अलीकडेच सैजुद्दीनने आणखी एका हिंदु महिलेला फसवून तिच्याशी विवाह केला. २ हिंदु तरुणींशी विवाह केल्यामुळे सैजुद्दीनला २० लाख रुपये मिळाले आहेत. पैसे मिळाल्यावर तो त्या महिलांना सोडून देत होता.’
लव्ह जिहादची आणखीही एक तक्रार प्रविष्ट (दाखल) !
नागपुरा परिसरातील एका युवतीच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधून एका लव्ह जिहाद्याने त्यांच्या मुलीला फूस लावून तिच्याशी विवाह केल्याचा आणि तिला हैदराबादला नेल्याचा आरोप केला. केंद्रापाडाचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कटारिया यांनी सांगितले की, हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी