
फलटण, २५ डिसेंबर (वार्ता.) – येथील ‘दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’तील ११२ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २३ डिसेंबर या दिवशी फलटण आणि कराड शहरात ५ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घातल्या. अन्वेषणात महत्त्वाची कागदपत्रे हाती आली असून २ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.
यशवंत बँकेतील आर्थिक अपहार प्रकरणी १२ ऑक्टोबर या दिवशी कराड शहर पोलीस ठाण्यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी संयुक्तपणे करत आहे. यापूर्वी २२ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. वर्ष २०१४ ते २०२५ या कालावधीत बँकेच्या व्यवहारांचे वैधानिक लेखापरीक्षण करतांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आढळून आल्याची तक्रार सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी केली आहे. बनावट कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप, तारण न घेता कर्जाला मान्यता, निधीचा गैरवापर, जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवी खाती उघडून निधी अन्य व्यक्तीकडे वळवणे, असे अनेक आरोप लेखापाल देशपांडे यांनी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर केले आहेत.
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘सनातन क्रांती’ची नांदी !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक