महापालिका निवडणुकी अंतर्गत नागपूर आयकर विभागाचा प्रयत्न !

नागपूर – आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा होणारा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने २४ घंटे कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र स्थापन केले आहे.
१. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल क्रमांक चालू करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये संशयास्पद स्थितीत मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा वस्तू नेतांना आढळल्यास नागरिक ०२२-२२६३५५११, २२६२७२७५ आणि १८००-०२२-०११५ (टोल फ्री) या क्रमांकांवर तक्रार करू शकतात.
२. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयकर विभाग संबंधित प्रकरणाची आयकर कायद्यातील प्रावधानानुसार चौकशी करील. जर संबंधित व्यक्ती समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकली नाही, तर तिच्याकडील रक्कम किंवा वस्तू जप्त केली जाईल.
३. ‘नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा वस्तू नेतांना गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र आणि पॅनकार्ड समवेत ठेवावे’, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.
४. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येथील नागरिकांसाठी प्रधान आयकर विभागाच्या वतीने (अन्वेषण) १८००-२३३-०३५५ आणि १८००-२३३-०३५६ हे ‘टोल फ्री’ क्रमांक घोषित करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त नागरिक [email protected] आणि [email protected] या ई-मेल पत्त्यांवरही तक्रारी पाठवू शकतात.
५. काळ्या पैशांच्या वापराशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ किंवा ध्वनीचकती यांसारखे पुरावे ९४०३३ ९०९८० या भ्रमणभाष क्रमांकावर पाठवता येतील. रोख रकमेचे वाटप किंवा वाहतूक करण्यासंबंधीची माहिती मिळाल्यास ती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार