
नवी देहली – ओमानने भारताच्या हलाल मांस प्रमाणनाला अधिकृत मान्यता दिली आहे. आता भारत सरकार इतर ५५ इस्लामी देशांकडूनही अशीच मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, ज्या देशांमध्ये मांस आणि मांसजन्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी हलाल प्रमाणन आवश्यक आहे, त्या देशांशी भारत चर्चा करत आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून आखाती देशांशी सातत्याने संवाद चालू असून अनौपचारिक पद्धतींऐवजी भारताची अधिकृत हलाल प्रमाणित उत्पादने स्वीकारली जावीत, यासाठी प्रयत्न होत आहेत.
🇴🇲 Oman recognizes India’s Halal certification.
But a serious question arises 🇮🇳👇
Halal certification should be limited to exports or Islamic countries only.
❗Within India, Hindus are being forced to buy unnecessary Halal-certified food & goods.
📜 A clear law is needed: No… pic.twitter.com/NWJdp6IN1W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 22, 2025
निर्यातदारांना होणारे लाभ
ओमानकडून भारताच्या हलाल प्रमाणनाला मान्यता मिळाल्यामुळे अनेक लाभ होणार आहेत. वारंवार तपासणी आणि पुन्हा प्रमाणन करण्याची आवश्यकता रहाणार नाही. त्यामुळे खर्च अल्प होईल आणि भारतीय निर्यातदारांना बाजारपेठेत प्रवेश सुलभ होईल. पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की, केवळ अधिकृतरित्या मान्य केलेले हलाल प्रमाणनच ग्राह्य धरले जावे, यावर सरकारचा भर राहील. ही योग्य आणि प्रक्रियाधिष्ठित हलाल प्रमाणन पद्धत असून धार्मिक भावना अधिकृत अन् शिस्तबद्ध प्रक्रियेद्वारे जपल्या जाव्यात, अशी सरकारची भूमिका आहे.
प्रमाणन प्रक्रियेतील पालट
पूर्वी अनेक खासगी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्रे दिली जात होती, ज्यांना सरकारी मान्यता नव्हती. मार्च २०२३ मध्ये परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना प्रसारित केली होती. त्यानुसार केवळ भारतीय गुणवत्ता परिषदेच्या ‘इंडिया कन्फॉर्मिटी असेसमेंट स्कीम’ हलाल अंतर्गत आणि मान्यताप्राप्त संस्थांकडून दिलेले प्रमाणनच वैध ठरणार आहे. ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेत किमान १५ देशांची सूची देण्यात आली होती, जिथे हलाल मांस आणि मांसजन्य उत्पादनांचे प्रमाणन आवश्यक आहे. यामध्ये तुर्कीये, ओमान, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, फिलिपिन्स आणि सिंगापूर यांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाभारत सरकारने हलाल प्रमाणापत्र केवळ इस्लामी देशांपर्यंत किंवा विदेशी देशांपर्यंतच मर्यादित ठेवावे. भारतात ते असू नये, असा कायदा करावा. भारतातील हिंदूंना अनावश्यक हलाल प्रमाणित वस्तू, पदार्थ घ्यावे लागत आहेत, याकडे लक्ष द्यावे ! |
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !