पाक आणि चीन यांच्यासाठी हेरगिरी करणारे जाळे सक्रीय असल्याची माहिती

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – राज्यातील पोलिसांनी गेल्या १० दिवसांत पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी जाळ्याशी संबंधित ४ संशयितांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी सैनिकाच्या हालचाली आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तानी हस्तकांना पाठवत होते. प्राथमिक अन्वेषणात या जाळ्याचा चीनशी संबंध असल्याचे संकेतही मिळाले आहेत. दुसरीकडे स्थानिक लोकांनी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ चिनी सैन्याच्या उपस्थितीची आणि संभाव्य घुसखोरीची माहिती दिली आहे. राज्याचे गृहमंत्री मामा नातुंग यांनी सांगितले आहे की, हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
१. इटानगर येथून ११ डिसेंबरला जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नझीर अहमद मलिक आणि सबीर अहमद मीर यांना अटक करण्यात आली. दोघेही ब्लँकेट विक्रेते म्हणून फिरत होते आणि टेलिग्राम चॅनेलद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या (हस्तकांच्या) संपर्कात होते. त्यांना बेकायदेशीर घुसखोरीत साहाय्य करण्यासाठी आणि शस्त्र तस्करीसाठी निर्देश मिळाल्याचे समोर आले.
२. १३ डिसेंबरला काश्मीरमधील आणखी २ तरुणांना पकडण्यात आले. हे जाळे आसामपर्यंत पसरलेले असल्याचे संकेत मिळाले आहेत. हेरगिरीच्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी तेजपूर येथून अटक केलेले वायूसेनेचे निवृत्त अधिकारी कुलेंद्र शर्मा यांनाही याच साखळीशी जोडून पाहिले जात आहे. आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्ये येथे शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
३. पकडले गेलेले संशयित स्थानिक मुसलमान समुदायांमध्ये मिसळून स्लीपर सेल (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) विकसित करण्याचा प्रयत्न करत होते. काही बांगलादेशी तरुणांची भूमिकाही संशयास्पद मानली जात आहे.
संपादकीय भूमिकाअशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !