|

नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि निर्यात प्रकरणांशी संबंधित उप नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. बेंगळुरूमधील आस्थापनाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शर्मा यांच्या घराची झडती घेतली असता तिथे २ कोटी २३ लाख रुपयांची रोकड आढळून आली. या प्रकरणात त्यांची पत्नी कर्नल काजल बाली यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कर्नल बाली या सध्या राजस्थानच्या श्री गंगानगर येथील १६ इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डिनन्स युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून तैनात आहेत. त्यांच्या श्रीगंगानगर येथील निवासस्थानाहून १० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
🪖 Betrayal of the Uniform: Army Couple Booked for Corruption 🪖
A Defence Ministry officer, Lieutenant Colonel Deepak Kumar Sharma, has been arrested in a bribery case.
💰 ₹2.23 crore cash recovered from his residence.
A case is also registered against his wife, Colonel… pic.twitter.com/f2OW9Bu5F5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 21, 2025
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट कर्नल शर्मा हे संरक्षण उत्पादनांचे निर्माण आणि निर्यात यांच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक खासगी आस्थापनांशी संगनमत करून फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित कारवायांमध्ये गुंतले होते.
आस्थापनांना लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात शर्मा यांनी रोख रक्कम घेतली होती. राजीव यादव आणि रवजीत सिंह नावाचे २ व्यक्ती लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्या नियमित संपर्कात होते. त्यांच्या आस्थापनाला लाभ मिळण्यासाठी ते अवैध मार्गांचा वापर करत होते. १८ डिसेंबर २०२५ या दिवशी या आस्थापनाच्या सांगण्यावरून विनोद कुमार नामक व्यक्तीने दीपक कुमार शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच दिली.
संपादकीय भूमिकासैन्यातील अधिकारी असणार्या या लाचखोर पती-पत्नींना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल ! |
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी