सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा देशव्यापी गजर !
नवी देहली येथील भारत मंडपम् येथे १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा संस्कृती, सुरक्षा आणि शौर्य जागृती करणारा अविस्मरणीय संगम ठरला. या भव्य सोहळ्याला संपूर्ण भारतभरातील विविध प्रसिद्धीमाध्यमांकडून चांगला प्रतिसाद लाभला. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे या माध्यमांतून महोत्सव २३ कोटी ५० लाखांहून अधिक दर्शक अन् वाचक यांच्यापर्यंत पोचला. यामुळे हा कार्यक्रम देशव्यापी चर्चेचा विषय ठरला.

मुलाखती आणि चर्चासत्रे – एकूण १९ माध्यमे (दर्शकसंख्या : १ कोटी)
सर्वाधिक प्रभावी प्रतिसाद मुलाखती आणि चर्चा कार्यक्रमांमधून मिळाला. ‘अमर उजाला’, ‘एन्.एम्.एफ्. न्यूज’, ‘कॅपिटल टीव्ही’, ‘सुदर्शन न्यूज’, ‘हिंदुस्थान तहलका न्यूज’, ‘द कॉन्क’, ‘जयपूर डायलॉग्स’, ‘नम्मा टीव्ही’, ‘प्रारब्ध’, ‘ऑफ द स्क्रिप्ट’, ‘उदय इंडिया’, ‘ग्लोबल लेंस’, ‘द लखनऊ डायलॉग्स’, ‘संगम टॉक्स’, ‘नीरज अत्री चैनल’, ‘डेफ टॉक बाय’, ‘एम्.बी.एन्. नेटवर्क’ ‘हिंदुस्तान पोस्ट’ आदी १९ हून अधिक प्रमुख प्रसारमाध्यमांतून सादर झालेल्या संवादांतून महोत्सवाचे विचारमूल्य प्रसारित झाले. या प्रसारमाध्यमांमुळे १ कोटीहून अधिक प्रेक्षकांपर्यंत शंखनादाचा संदेश पोचला.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय माध्यमांकडून प्रसिद्धी – एकूण ३५ वृत्तपत्रे !
महोत्सवाच्या वृत्तांकनात ३५ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रांनी वार्तांकन केले. दैनिक ‘भास्कर’, ‘जागरण’, ‘अमर उजाला’, ‘राजस्थान पत्रिका’, ‘लोकमत’, ‘सकाळ’, ‘पुढारी’, ‘नवराष्ट्र’, ‘पुण्यनगरी’, ‘दिव्य मराठी’, ‘गोमंतक’, ‘नवभारत’, ‘तरुण भारत’, ‘पायोनियर’, ‘हिंदुस्तान टाइम्स’ आणि ‘रिपब्लिक न्यूज इंडिया’ या अग्रगण्य वृत्तमाध्यमांनी, तर ‘पीटीआय’, ‘यू.एन्.आय.’ या वृत्तसंस्थांनी महोत्सवाचे वृत्तांकन केले. या छापील माध्यमांद्वारे सुमारे ३ कोटी ५० लाखांहून अधिक वाचकांपर्यंत सनातन राष्ट्र शंखनादाचा संदेश पोचला.
डिजिटल माध्यमे आणि वेब पोर्टल प्रसार – एकूण १८ ‘पोर्टल्स’ !
डिजिटल माध्यमांद्वारेही महोत्सवाचा ठसा उमटला. ‘डीडी न्यूज’, ‘न्यूज १८ झारखंड’, ‘यू.एन्.आय.’, ‘ए.एन्.आय.’, ‘जनमानस’, ‘दि वायर’ आणि ‘सनातन सारथी’ ‘हिंदुस्तान पोस्ट’ यांसह १८ ‘वेब पोर्टल्स’नी वार्तांकन केले. विविध ऑनलाईन लेख, छायाचित्रे आणि थेट घडामोडी (अपडेट्स) यांद्वारे हा महोत्सव २५ लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोचला.
स्थानिक वृत्तपत्रे आणि संकेतस्थळे यांचे व्यापक प्रसारण : एकूण १७४ माध्यमे
स्थानिक स्तरावरील १७४ हून अधिक वृत्तपत्रे आणि संकेतस्थळे, उदा. ‘हिंदुस्थान समाचार’, ‘प्रभात पर्व’, ‘ठाणे दखल वृत्तवाहिनी’, ‘गोवा खबर’, ‘लखनऊ संदेश न्यूज’ इत्यादींनी महोत्सवाविषयी प्रादेशिक आणि स्थानिक भाषांतून विशेष लेख, प्रसिद्धीपत्रक अन् अन्य माध्यमांतून प्रसिद्धी दिली. या व्यापक प्रसारणाने ४ कोटी ३५ लाखांपर्यंत वाचकसंख्या गाठली.
टीव्ही, केबल आणि ‘यू ट्यूब’ वाहिनी प्रसारण – एकूण १५ माध्यमे (दर्शकसंख्या : १२ कोटी ४० लाख)
देहली महोत्सवाचे थेट प्रक्षेपण अंदाजे १५ ‘यू ट्यूब’, टीव्ही आणि केबल नेटवर्क यांवरून करण्यात आले. ‘एबीपी न्यूज’, ‘झी न्यूज’, ‘न्यूज १८ एम्.पी. छत्तीसगड’, ‘सुदर्शन न्यूज’, ‘दिल्ली नेगी व्लॉग्स’, ‘यूनिक गोवा’, ‘स्वर्णपत्र’, ‘ब्रॉडकास्ट मंत्रा’, ‘भक्ति न्यूज’, ‘एस्.डी. संगम टीव्ही चॅनल’, ‘सबगुरु न्यूज’, ‘पॉवर पॉईंट खबर’, ‘KKG क्रिएटिव ज्ञान’, ‘SPN9NEWS सामाजिक आईना’, ‘गरवी गुजरात’, ‘इंडिया डेली डिजिटल’, ‘OTV न्यूज इंग्लिश’, ‘ऑफ-द-स्क्रिप्ट’, ‘ठाणे दखल वृत्तवाहिनी’, ‘न्यूज जंक्शन २४’, ‘पोलिट लाईव्ह’ आणि ‘RDX गोवा’ यांनी विशेष प्रसिद्धी दिली. या प्रसारणांमुळे एकूण १२ कोटी ४० लाखांहून अधिक लोकांनी महोत्सव पाहिला.
थेट प्रक्षेपण – एकूण १० माध्यमे (दर्शकसंख्या २ कोटी)
‘जयपूर डायलॉग्स’ आणि ‘सुदर्शन न्यूज’, ‘रिपब्लिक भारत’, ‘हिंदुस्थान पोस्ट’, ‘हिंदुस्तान’, ‘तहलका न्यूज’, ‘द कॉन्क’, ‘टोटल टीव्ही’, ‘सातारा न्यूज’, ‘एस्.डी. संगम टीव्ही चॅनल’, ‘पुना केबल’ यांनी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. यामध्ये दोन सत्रांपासून संपूर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले गेले. या माध्यमांमुळे २ कोटींहून अधिक दर्शकांपर्यंत महोत्सवाचा विषय पोचला.
भारतीय संस्कृतीच्या नव्या जागृतीचा शंखनाद !
संस्कृती, सुरक्षा, शौर्य, तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा नाद पुन्हा करणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाने भारतीय परंपरेचा गौरव, संस्कारांची अभिव्यक्ती आणि राष्ट्रभाव पुन्हा जागृत केला. विविध स्तरांवरील माध्यमांचा मिळालेला प्रतिसाद हा या महोत्सवाच्या राष्ट्रीय प्रभावाची प्रचीती आहे.
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?