सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १५ डिसेंबर या दिवशी देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातील ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची वैज्ञानिक ते आध्यात्मिक यात्रा’ हा कक्ष पहातांना त्यांनी काढलेल्या उद्गारांतून गुरुदेवांच्या सनातन राष्ट्रासाठीच्या कार्याची व्यापकता आणि त्यांचे अस्तित्व साधकांनी सूक्ष्मातून अनुभवले. याविषयी आणि गुरुदेवांविषयीचे मान्यवरांचे उत्स्फूर्त अभिप्राय येथे दिले आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक कार्याची माहिती देणारे प्रदर्शनातील फलक


ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या दिव्यतेची कृपा !
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा माझ्यासाठी एक दिव्य प्रेरणादायी अनुभव आहे. या महोत्सवाचा मी एक भाग झालो, याविषयी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे ६८ वर्षे वय असूनही या महोत्सवात माझ्यात तरुणाप्रमाणे उत्साह होता. ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आशीर्वादात्मक दिव्यतेची कृपा आहे.
– श्री. मानससिंग रे, हिंदुत्वनिष्ठ, हावडा, बंगाल.
भारतातील विविध भागांतून आलेल्या धर्मनिष्ठ हिंदूंनी देहलीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या एका व्यासपिठावर येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्रित कार्य करण्याचा निश्चय केला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना साकार करण्याचा निर्धार केला आहे.
– मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ऊर्जेमुळेच देहलीत हिंदूंचे विचारमंथन !

लोक सरकार निवडून आणतात; परंतु त्यांचे मूळ प्रश्न, समस्या मांडायला पुढे येत नाहीत. त्यामुळेच सनातन संस्था जे कार्य करते, ते महत्त्वाचे आहे. माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अथक तपस्येतून असे संघटन निर्माण केले आणि आम्हा सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ऊर्जेचा स्रोत निर्माण केला आहे, त्यामुळे आज देहलीतील या व्यासपिठावर हिंदूंच्या समस्यांविषयी मंथन करू शकत आहोत. मी आणि माझे पिता पू. हरि शंकर जैन यांनी आतापर्यंत जे यश मिळवले आहे, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे आहे. हिंदूंच्या या मोठ्या संघटनाला मां भगवतीदेवीचे आशीर्वाद मिळो आणि जेव्हा भारत सनातन राष्ट्र बनेल, तो दिवस पहाण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आमच्यासह असावेत, असा आम्हा सर्वांचा भाव आहे !
– अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय
|
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !