प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी दिलेले आशीर्वचन !
अयोध्येतील श्रीराममंदिरावरील ध्वजारोहण हिंदु राष्ट्राच्या ध्वजारोहणात परिवर्तित होईल !
हिंदु समाजाला बलशाली व्हावे लागेल. आपल्याला केवळ शंखनाद करायचा नाही, तर श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र धारण करायचे आहे. अर्जुनाचे गांडीव धारण करावे लागेल. श्रीरामाच्या कोदंडाला सिद्ध ठेवावे लागेल. जेव्हा आपल्याकडे शक्ती येते, तेव्हा कुणीही आक्रमणाचे धाडस करत नाही. शांती निर्माण करण्यासाठी सज्जनांना शक्तीमान व्हायला हवे. हिंदुत्वाचा स्वभाव ‘सज्जनत्व’ हा आहे. हिंदुत्व म्हणजे धर्म किंवा पूजापद्धत नसून राष्ट्रीयतेचा हुंकार आहे, ज्या राष्ट्रात सगळे समान आहे, कुणाचे शोषण न होता प्रत्येकाला त्याच्या पूजापद्धतीचे आचरण करण्याचा अधिकार आहे. अयोध्येत झालेले श्रीराममंदिर हा राष्ट्रमंदिराचा पाया आहे. तेथे झालेले ध्वजारोहण लवकरच हिंदु राष्ट्राच्या ध्वजारोहणात परिवर्तित होईल, असा मला विश्वास आहे.
सनातन संस्कृतीचे श्रेष्ठत्व समजावण्यासाठी महोत्सव !

प्राचीन भारतीय परंपरेचे श्रेष्ठत्व वैज्ञानिक दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न सनातन संस्थेने शंखनाद महोत्सवातून केला. भारतीयच भारतीय संस्कृतीची अवहेलना करतात; पण तो अपसमज या प्रदर्शनाद्वारे दूर होईल. ब्रिटन आदी देशांनी चोरलेल्या, लुटलेल्या वस्तू त्यांच्या संग्रहालयात ठेवल्या; परंतु ‘कोर हेरिटेज’ने शिवकालीन शस्त्रे शोधून त्यांचा संग्रह करून वीरतेचा वारसा जपला, हे कौतुकास्पद आहे. शस्त्रनिर्मितीच्या विज्ञानातून सनातनसारखा वैज्ञानिक धर्म जगात दुसरा कोणताही नाही, हे लक्षात येते. हिंदु धर्मात कोणतीही गोष्ट कपोलकल्पित नाही. भारताला महान बनवण्यात सनातन संस्थेचा मोठा वाटा असेल.
– श्री. वैभव डांगे, संस्थापक, देहली मराठी प्रतिष्ठान, तसेच पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचे धोरणतज्ञ; सदस्य, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स


अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !