अध्यात्मशास्त्रावर अनेक ग्रंथ उपलब्ध असतांना सनातन संस्था परत त्याच विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र आहे. त्यामुळे त्यातील एखाद्या विषयाच्या संदर्भात अनेक ग्रंथ उपलब्ध असतात. बहुतांश ग्रंथांमध्ये त्या विषयाच्या संदर्भातील ७० टक्के माहिती सर्वसाधारण असते, तर ३० टक्के माहिती वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे एखाद्या विषयाच्या संदर्भातील अभ्यास करतांना अभ्यासकाचा ७० टक्के माहिती परत परत वाचण्यातील वेळ वाया जातो. यासाठी सनातनच्या ग्रंथांमध्ये अशा विविध ग्रंथांमधील ३० टक्के वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संकलन केलेले आहे. त्यामुळे त्या अभ्यासकांचा वेळ वाचून तो वेळ त्यांना साधनेसाठी देणे शक्य होते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


सनातनचे ग्रंथ हे साधना करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अध्यात्मशास्त्राची तोंडओळख करून देणारे !

‘अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र आहे. त्याचा िकतीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो. त्यामुळे साधकासाठी ‘साधना’ म्हणून कृती करणेच महत्त्वाचे असते आणि शास्त्र हे केवळ कृतीमागील कार्यकारणभाव जाणून घेण्याइतपत शिकणे आवश्यक असते. या कारणांमुळे सनातनने विविध विषयांवर प्रकाशित केलेले ग्रंथ हे सध्या साधकांना केवळ अध्यात्मशास्त्राशी संबंधित विषयांची तोंडओळख करून देण्यापुरतेच आहेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले