
नवी देहली – हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन यांच्या ‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ या माहितीपटाचे १२ डिसेंबर या दिवशी ‘कुरुक्षेत्र गुरुकुल फाऊंडेशन धर्म अलंकार’ या कार्यक्रमात जगद्गुरु ज्योतिर्मठ शंकराचार्य श्री स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी त्यांना शंकराचार्य यांनी पारितोषिकही प्रदान केला. मयंक जैन यांनी म्हटले की, हा केवळ पुरस्कार नसून ही एक सांस्कृतिक चळवळीला मिळालेली पोचपावती आहे.
Jagadguru Jyotirmath Shankaracharya Swami Avimukteshwaranand honoured Mayank Jain (@mayankjain100) on December 12 at the Kurukshetra Gurukul Foundation Dharma Alankar programme and released his documentary “Crimson Crescent – The Last Quarter.” 🕉️
🚩The documentary was released… pic.twitter.com/YDxGzgkddb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 18, 2025
‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ या माहितीपटामध्ये आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशिया येथे मदरशांमधून वहाबी विचारसरणी (वहाबी विचारसरणी ही कुराण आणि सुन्नत यांच्यातील लिखाणाच्या शब्दश: अर्थावर जोर देते) कशा प्रकारे प्रसृत केली जाते, याविषयी माहिती आहे. ही माहिती प्रसृत करणारा सौदी अरेबियामध्ये राजकुमार महंमद बिन सलमान (एम्.बी.एस्.) यांच्या नेतृत्वाखाली सुधारणावादाचे वारे वाहू लागले आहे. ‘राजकुमार महंमद बिन सलमान कट्टर इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणणार का ?’, असा प्रश्न या माहितीपटात विचारण्यात आला आहे.
हिंदुत्वनिष्ठ मीनाक्षी शरण देवी दुर्गा पुरस्काराने सन्मानित

गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत सनातन धर्माच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या ८० कोटींहून अधिक हिंदूंच्या स्मरणार्थ ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या संस्थापिका मीनाक्षी शरण गेल्या १० वर्षांपासून सामूहिक तर्पण उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांना देवी दुर्गा पुरस्काराने सन्मानित केले.
@meenakshisharan, founder of the Ayodhya Foundation, was honoured with the Devi Durga Award by Jagadguru Jyotirmath Shankaracharya Swami Avimukteshwaranand.
For the past 10 years, she has led a collective tarpan initiative in memory of over 80 crore Hindus who sacrificed their… pic.twitter.com/koN2mI5FOX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 18, 2025
‘शंकराचार्य यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे हा उपक्रम राबवणार्या हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प अधिक दृढ झाला आहे’, असे मीनाक्षी शरण यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक