|

भारत मंडपम्, देहली, १३ डिसेंबर (वार्ता.) – आज येथे कवी भूषण यांच्या ओळी मला अत्यंत समर्पक वाटतात की, ‘अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी ।’ आज हिंदु समाजाचे जे अस्तित्व आहे, ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे ! अन्यथा आमच्यासारख्या महिला आज कुठेतरी हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी अत्यंत लाजिरवाणे जीवन जगत असत्या, असे हिंदूंना अंतर्मुख करणारे प्रतिपादन मूळच्या गोवा येथील आणि आता पुणे येथे असलेल्या हिंदुत्वनिष्ठ लेखिका सौ. शेफाली वैद्य यांनी केले.
सौ. शेफाली वैद्य या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी आणि वर्तमान भारत’ या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या चर्चासत्रात सौ. वैद्य यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती’चे महासचिव कर्नल मोहन काकतीकर (निवृत्त), भारताचे माजी सूचना आयुक्त आणि ‘सेव्ह भारत, सेव्ह कल्चर फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. उदय माहुरकर आणि ‘सरयु फाऊंडेशन’चे श्री. राहुल दिवाण सहभागी झाले होते. ‘जागरण न्यू मिडिया’च्या वरिष्ठ राजकीय संपादक स्मृती रस्तोगी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्राला उपस्थितांचा प्रचंड उत्साही प्रतिसाद लाभला.
सौ. वैद्य पुढे म्हणाल्या की, वर्ष १५६५ मध्ये तालिकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याच्या रामरायांची हत्या करून निजामशहाने त्यांचे शीर वेशीवर टांगले. हिंदूंचे मनोधैर्य खच्ची केले. त्यानंतर १०० वर्षांनी शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली. ५ पातशाह्यांशी लढून उभारलेले राज्य पुन्हा शत्रूला दिले; पण नंतर आगरा येथून औरंगजेबाच्या तावडीतून मुक्तता करून घेतली आणि पुन्हा सर्व राज्य शून्यातून मिळवले. त्यांनी मंदिररक्षण केले. मोगल, पोर्तुगीज यांनी पाडलेली मंदिरे पुन्हा बांधली. शिवछत्रपतींचे राज्य धर्माधिष्ठित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्तुंग प्रेरणेमुळेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर सिंहासनावर राजा नसतांनाही २७ वर्षे मराठे मोगलांशी लढले.
शिवछत्रपतींचे स्वराज्य हे आदर्श धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘श्रीं’ची म्हणजेच भगवंताची इच्छा म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी गोमाता, मंदिरे, धर्मपरंपरा आदींचे प्रत्यक्ष रक्षण केले. परकीय आक्रमकांच्या भाषेचा प्रभाव रोखण्यासाठी संस्कृतमध्ये राजमुद्रा, राज्यव्यवहारकोश आदी बनवले. शास्त्रसंमत कायदे सिद्ध केले. धर्मशास्त्रसंमत स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला; मात्र त्यामागे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती, तर भगवद्सेवा, समाजसेवा असा उदात्त हेतू होता. धर्मराज्य म्हणजे जेथे राष्ट्र, धर्म, व्यक्ती आणि समाज या सर्वांच्या उन्नतीची व्यवस्था असते, असे राज्य ! यातून स्पष्ट होते की, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे आदर्श असे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच होते.
मावळ्यांप्रमाणे आजच्या नागरिकांनाही सैन्यप्रशिक्षण आवश्यक ! – कर्नल मोहन काकतीकर (निवृत्त), महासचिव, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे सैन्य अल्प असूनही ४०० किलोमीटर प्रवास करून सूरतेची लूट केली. तेव्हा सामान्य व्यक्तीला त्रास होणार नाही, असे नियोजन केले. औरंगजेबाने केलेल्या अवमानाचा प्रतिशोध घेतला. पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ त्यांनी लाल महालात बसलेल्या शाहिस्तेखानावर केला आणि त्याला पळवून लावण्यात ते यशस्वी झाले. ‘ज्याचे नौदल त्याची समुद्रावर सत्ता !’ हे स्वराज्याचे धोरण ठरवत देशाचे पहिले नौदल स्थापन करणे, हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य शेतकरी वर्गातील युवकांना आवश्यक ते युद्धप्रशिक्षण देऊन मावळे सिद्ध केले. त्या सैन्याच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे आज नागरिकांना ऐच्छिकदृष्ट्या सैन्यप्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे.
आज शिवछत्रपतींची संस्कृतीरक्षणाची नीती आवश्यक ! – उदय माहुरकर, माजी सूचना आयुक्त, भारत सरकार आणि संस्थापक, ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाऊंडेशन’
१ सहस्र ६०० किलोमीटर लांबीचे हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना खर्या अर्थाने जो मान-सन्मान मिळायला हवा होता, तो आज मिळालेला नाही. गेल्या १ सहस्र वर्षांत शिवछत्रपतींसारखा तेजस्वी राजा झालेला नाही. शिवछत्रपतींनी धर्मांतरित झालेल्या फलटणच्या बजाजी निंबाळकर यांचे केवळ शुद्धीकरण केले नाही, तर त्यांना स्वतःची मुलगीही दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाषाशुद्धीची प्रेरणा शिवछत्रपतींकडून मिळाली. त्यांनी केलेले संस्कृतीरक्षणाचे कार्य, हीच ‘सेव्ह भारत, सेव्ह कल्चर फाऊंडेशन’ची प्रेरणा आहे. आज भारतात ज्या पद्धतीने दूरचित्रवाहिन्या, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आदींद्वारे अश्लीलतेचा भडीमार चालू आहे, ते पहाता त्याविरुद्ध सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे. भारताला वर्ष २०४७ मध्ये ‘महासत्ता’ बनवतांना त्याला सांस्कृतिकदृष्ट्या भिकेकंगाल बनवणे उपयोगाचे नाही. त्यासाठी शिवछत्रपतींची संस्कृतीरक्षणाची नीती अवलंबायला हवी.
शिवछत्रपतींप्रमाणे आक्रमक रणनीतीची आजही आवश्यकता ! – राहुल दिवाण, संस्थापक, ‘सरयु फाऊंडेशन’
अहमद शहा अब्दाली प्रतिवर्षी येऊन पंजाब लुटून जात असे; मात्र शिवछत्रपतींच्या प्रेरणेने सिद्ध झालेले मराठे वर्ष १७६१ मध्ये पानीपतच्या लढाईत हरले असले, तरी त्यानंतर अब्दाली पुन्हा भारतावर चाल करून आला नाही. त्यामुळेच पुढे शिखांचे साम्राज्य उभे राहू शकले. शिवछत्रपती नसते, तर आपल्या सर्वांनाच ‘कलमा’ पढावा लागला असता. आज हिंदूंची शक्ती संरक्षणात्मक किंवा प्रतिक्रियात्मक आंदोलने, कायदे यांसाठी वाया जात आहे. जे धर्मांध लोक ३ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट वापरून लाखोंना मारून पूर्ण देश उद्ध्वस्त करण्याचे नियोजन करतात, त्यांच्यासमोर आंदोलनाची रणनीती अपयशी ठरू शकते. आज शिवछत्रपतींकडून ‘आक्रमक रणनीती’ शिकली पाहिजे, तसेच घाऊक प्रमाणात हिंदूंचे शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी महंत, कथावाचक आदींनी स्वेच्छेने स्वधर्मात येऊ इच्छिणार्यांची व्यवस्था केली पाहिजे. शुद्धीकरणाची प्रक्रिया जलद आणि सोपी असली पाहिजे.
क्षणचित्रे :१. श्री. राहुल दिवाण म्हणाले, ‘‘देशभरात केवळ सनातन संस्थाच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची मागणी करतांना दिसते !’’ २. चर्चासत्रात उपस्थितांकडून अधूनमधून शिवछत्रपतींचा जयघोष करण्यात येत होता. सौ. शेफाली वैद्य यांनी त्यांच्या वक्तव्याचा समारोप करतांना ‘तेज तम अंस पर…’ हे कवी भूषण यांचे काव्य म्हटले आणि त्यामुळे सभागृहात प्रचंड उत्साह संचारला. ३. या वेळी एका धर्मप्रेमीने उत्फूर्तपणे शिवछत्रपतींची बिरुदावली अत्यंत क्षात्रवृत्तीने म्हटली. त्यामुळे संपूर्ण सभागृह शिवमय झाले. |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले