चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी

चिपळूण, ११ डिसेंबर (वार्ता.) – मार्च २०२५ मध्ये ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ व्हावा, या मागणीसाठी महिलांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यात १ लाखाहून अधिक ‘लव्ह जिहाद’च्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत’, असे सांगितले. ही वस्तूस्थिती असतांना आतापर्यंत हिंदु जनतेकडून मागणी करूनही महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा झालेला नाही. यासाठी ‘चालू हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा महाराष्ट्रात झालाच पाहिजे’, अशी मागणी करणारे आंदोलन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले. शहरातील खेडेकर क्रीडा संकुलासमोर १० डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे लक्ष्यवेधी आंदोलन झाले. या आंदोलनात विविध संघटना, संप्रदाय आणि सर्वसामान्य हिंदु महिला अन् युवती यांची मोठी उपस्थिती होती.
या वेळी महिला प्रतिनिधींनी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ होण्यास महाराष्ट्र शासनाने विलंब न करता तो लवकरात लवकर करावा’, अशी मागणी तीव्रतेने केली.
या आंदोलनात हिंदु राष्ट्र समन्वय समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, भाजप, ग्रामदैवत कालभैरव सांस्कृतिक मंच, संस्कार भारती, सनातन संस्था आदी विविध संघटना, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदु बंधूभगिनी उपस्थित होते.
आंदोलनाच्या शेवटी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’विषयी मागणीचे निवेदन देण्यात आले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !