|
तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर मंदिराच्या लाडू भेसळीच्या प्रकरणानंतर आता प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या रेशमी शेल्यांच्या विक्रीतील गैरव्यवहार समोर आला आहे. एका ठेकेदाराने शुद्ध मलबरी रेशमी शेल्यांऐवजी १० वर्षे पॉलिस्टरचे शेले पुरवले. पैसे मात्र रेशमी शेल्यांचे घेतले गेले. प्रत्यक्ष बाजारभावाने ३५० रुपयांचा १ शेला तिरुमला तिरुपती देवस्थानम् म्हणजेच टीटीडीला १ सहस्र ३०० रुपयांना विकला गेला. हा प्रकार वर्ष २०१५ ते २०२५ पर्यंत चालू होता. या काळात टीटीडीने संबंधित ठेकेदाराला सुमारे ५४ कोटी रुपये दिले. आता टीटीडी मंडळाने अध्यक्ष बी.आर्. नायडू यांच्या निर्देशानुसार अंतर्गत चौकशी चालू केली आणि त्यातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला.
📢 After the Laddu Scam, Another Shock from Tirupati Temple!
Now a dupattas scandal surfaces, polyester cloth sold as “pure silk” for a decade! 😡
💸 ₹54 crore siphoned off in 10 years!Who enabled this?
🔍 Action must be taken not only against the contractor, but also against… https://t.co/cSvMSNhI8y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 11, 2025
नायडू यांच्या मते मंदिरात मोठे अर्पणदाते येतात, त्यांना प्रसाद म्हणून रेशमी शेला दिला जातो. तसेच विधींमध्येही रेशमी शेले वापरले जातात. इथेही स्वस्त पॉलिस्टरचा वापर करण्यात आला. घेतलेल्या नमुन्यांची चाचणी २ प्रयोगशाळांना पाठवण्यात आली. दोन्ही अहवालांत शेल्यांचे कापड पॉलिस्टरच असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवाल आल्यानंतर टीटीडी विश्वस्त मंडळाने आस्थापनाचे सर्व चालू कंत्राटे रहित केली असून संपूर्ण प्रकरण राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी सोपवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे कंत्राट देतांना त्याची कोणतीही निश्चिती आणि पडताळणी न करणार्या किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! या घटनांनंतर आणखी कोणत्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होत आहे का ? याची तपासणी करणे आवश्यक झाले आहे ! |

केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !