लहान मुलांमध्ये वारंवार होणारी सर्दी आणि खोकला यांविषयी काळजी घेण्यासाठी पुढील काही गोष्टींची माहिती येथे देत आहे.


१. सोय म्हणूनही चिप्स खायला नको. फळांमध्ये स्ट्रॉबेरी आणि आंबट फळे खाण्यास अजिबात द्यायला नको, तसेच बाकी फळेही जपूनच खायला हवीत. दुग्धजन्य पदार्थांमध्ये रात्रीचे दूध, दिवसाचे भरपूर दही-ताक द्यायला नको. मुलांना शाळेत लवकर जायचे झाल्यास अंघोळ करण्यासाठी अट्टाहास करायला नको.
२. घराला ओल येत असेल, तर त्याविषयी आवर्जून लक्ष ठेवावे आणि त्यावर उपाययोजना करावी. त्यावर उगवणार्या विशिष्ट बुरशीमुळे सर्दी अन् खोकला लक्षण असलेला आजार वारंवार होत रहातो.
३. मुलांच्या कोठ्यात जंत होत नाहीत ना, याकडे पहावे. जंतांचा त्रास एकदाच एक गोळी देऊन पूर्ण जात नाही. असलेले जंत मारणे, त्यांना बाहेर काढणे, त्यांचे जीवनचक्र थांबवणे, कृमींची पुढची पिढी सिद्ध होऊ नये म्हणून औषध घेणे अशा पद्धतीत पूर्ण काम आयुर्वेदात होते. तसा सल्ला घ्यावा.
४. मुलांना रात्री थेट पंख्याखाली झोपवण्यापेक्षा ‘क्रॉस व्हेंटिलेशन’ (खोलीत हवा खेळती रहाण्यासाठी विरुद्ध दिशांना असलेल्या खिडक्या) किंवा खिडकीला एखादा ‘एक्झॉस्ट फॅन’ (खोलीतील हवा बाहेर फेकणारा आणि बाहेरील हवा आत घेणारा पंखा) आणि ‘स्टँडी फॅन’ (उभा पंखा) असे पर्याय चांगले रहातात. थंडीपासून विशेषकरून छाती आणि डोके संरक्षित ठेवावे.
५. सर्दी आणि खोकला झाला असता ‘अँटिबायोटिक्स’वर (प्रतिजैविकांवर) पटकन अन् सतत उडी न मारता पर्यायी व्यवस्थेचा शोध घ्यावा. भारतात तरी भरपूर पर्याय आहेत. आपल्या उठसूट अतीवापराने जिथे आवश्यकता आहे, तिथे ‘रेसिस्टन्स’ (प्रतिकार) निर्माण होऊन / ‘ड्रग रेसिस्टन्ट’ (औषधांतून होणारी प्रतिकारशक्ती) जीवाणूंमुळे एखाद्या गरजू व्यक्तीची हानी होऊ नये इतकेच. या सगळ्यांवर रोग असतांना लगेच परिणाम देणारी, तसेच होऊ नये म्हणूनही आयुर्वेदात औषधे उपलब्ध आहेत. ती वैद्यांकडून आणता येतील.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१.१२.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !