सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ राजस्थान येथे असतांना महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणार होत्या. त्याविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी परात्पर गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सांगितले, ‘‘उद्या पहाटे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार त्रिनेत्र गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.’’ तेव्हा परात्पर गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले, ‘‘बघा, तुम्ही दोघी महर्षींच्या मुली आहात ना ! तुम्ही आश्रमात रात्री जागून सेवा करता, तर सौ. अंजली गाडगीळ दिवसभर सेवा करतात. सनातनच्या ईश्वरी कार्यासाठी तुम्ही दोघी दिवस-रात्र सेवा करत आहात.’’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले, ‘‘काकू, आपल्या दोघींविषयी असे कार्याच्या दृष्टीने परात्पर गुरुदेवांनी प्रथमच बोलणे चालू केले आहे. परात्पर गुरुदेवांच्या बोलण्यात प्रथमच आपल्या दोघींचे नाव आता एकत्रितपणे येत आहे. जणू काही यापुढे हे आध्यात्मिक कार्य आपल्या दोघींनाच पहायचे आहे’, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.’’

(‘हे खरेच आहे. महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. ‘गुरुदेवांचे अशा प्रकारचे बोलणे’, हे या घटनेची पूर्वसूचनाच होती.’ – संकलक)

– संग्राहक : एक साधक, रणथंबोर, माधोपूर, राजस्थान.

महर्षींनी नाडीपट्टीत वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महानता
अध्यात्मात निवृत्ती नसल्याने दैवी कार्यात कधीच निवृत्ती नसणे


‘एकदा परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणाले, ‘‘महर्षींची कृपा आणि तुम्ही दोघी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्यामुळे मी आता निवृत्त झालो आहे !’’

नंतर महर्षींनी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून) सांगितले, ‘सूर्य आणि चंद्र कधी निवृत्त होतात का ? असेच गुरुदेवांचे आहे. अध्यात्मात निवृत्ती नसते. दैवी कार्यात कधीच निवृत्ती नसते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ