
पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.)- ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात दत्तजयंतीनिमित्त भाविक भक्तांच्या वतीने जिल्ह्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेकडून ५२ ठिकाणी ‘आध्यात्मिक ग्रंथ’ तसेच ‘सात्त्विक उत्पादने’ यांचे कक्ष लावण्यात आले.
या कक्षांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी ‘सामूहिक नामजप’, ‘भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचे महत्त्व’ या विषयांवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यालाही दत्तभक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यामध्ये प्रामुख्याने गावठाण येथील रस्ते वाडा दत्त मंदिर, कोथरूड येथील प्रभात रस्त्यावरील श्री गुरुदेव दत्त मंदिर, हडपसर येथील पी.एम्.टी. थांब्याजवळील श्री दत्त मंदिर, सिंहगड रस्ता येथील साईबाबा मंदिर, चिंचवड येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळ या व अशा अन्य ठिकाणी जिज्ञासूंसाठी ‘सनातन कक्ष’ उभारण्यात आले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कक्षांना भेटी दिल्या आणि सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने यांविषयी जाणून घेतले.
२. जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !