इम्रान खान यांची बहीण अलीमा खानुम यांची टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे सैन्यप्रमुख आसिम मुनीर हे इस्लामी कट्टरतावादी आहेत, अशा शब्दांत इम्रान खान यांची बहीण अलीमा खानुम यांनी त्यांच्यावर टीका केली. त्या ‘स्काय न्यूज’ने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. इस्लामवर विश्वास न ठेवणार्या लोकांशी मुनीर लढून इच्छितात, असेही त्या म्हणाल्या.
या मुलाखतीत खानुम यांना मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाविषयी विचारले असता, त्यांनी थेट आसिम मुनीर यांच्यावर आरोप केले. त्या म्हणाल्या की, मुनीर त्यांच्या कट्टरतावादी विचारसरणीमुळे ते भारताविरुद्ध युद्ध करू इच्छितात. जेव्हा माझे बंधू इम्रान खान सत्तेत आले, तेव्हा त्यांनी भारत आणि अगदी भाजपशीही संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. याउलट मुनीर सीमेवर तणाव आणि युद्धाचे वातावरण निर्माण करत आहेत. इम्रान खान यांना पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कारागृहात टाकले असले, तरी आजही पाकिस्तानातील ९० टक्के लोक इम्रान खान यांच्याच बाजूने आहेत. मी पाश्चात्त्य देशांना त्यांच्या सुटकेसाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. इम्रान खान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वर्ष २०२३ पासून रावळपिंडीतील अडियाला कारागृहात असून तेथे त्यांचा मानसिक छळ केला जात आहे.
इम्रान खान यांच्या मृत्यूची पसरली होती अफवा !

२५ नोव्हेंबरला इम्रान खान यांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक आणि कुटुंबीय पोचले होते; परंतु कारागृहाच्या प्रशासनाने त्यांना अनुमती दिली नाही. त्यानंतर इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याची अफवा पाकिस्तानात वार्यासारखी पसरली. यावरून पाकिस्तानात मोठे आंदोलन करण्यात आले.
संपादकीय भूमिकास्वतःच्या भावाला अटक केल्यामुळे आता अलीमा खानुम यांना आसिम मुनीर इस्लामी कट्टरतावादी असल्याचे वाटत आहे. इतके दिवस त्या याविषयी काही बोलल्या का नाहीत ? |
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !