२ सहस्र कोटी रुपयांच्या ‘मसाला बाँड’ प्रकरणी ‘ईडी’ची कारवाई
(ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय)

थिरुवनंतपूरम् (केरळ) – ‘केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डा’च्या ‘मसाला बाँड’ व्यवहाराशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’च्या (काळा पैसा पांढरा करण्याची प्रक्रियेच्या) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. ४६८ कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित असलेली ही नोटीस मुख्यमंत्री विजयन् यांच्यासह ‘केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम्. अब्राहम आणि उपाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री टी.एम्. थॉमस आयझॅक यांनाही बजावण्यात आली आहे.
🚨 Notice to Kerala CM Pinarayi Vijayan
💼 Enforcement Directorate (ED) moves in on the ₹2,000 crore ‘Masala Bond’ scam.
Once again, communists prove they lead in everything from corruption to criminal misconduct! 😡
🇮🇳 For the nation’s sake, this anti-social government must… pic.twitter.com/mUW9nveWSU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 2, 2025
१. राज्याच्या प्रगतीसाठी ५० सहस्र कोटी रुपये उभारण्याच्या मोठ्या योजनेचा भाग म्हणून हे पैसे महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी होते.
२. ‘ईडी’ने म्हटले आहे की, ४६६ कोटी रुपये हे भूमीच्या संपादनासाठी वापरले गेले. हे ‘परकीय चलन व्यवस्थापन कायदा’ आणि ‘भारतीय रिझर्व्ह बँक’ यांच्या नियमांविरुद्ध आहे.
३. रोख्यांच्या रकमेशी संबंधित निधीचे हस्तांतरण आणि परकीय चलनाशी संबंधित अनियमितता यांसंदर्भात हे आरोप असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.
४. ईडीने वर्ष २०२१ मध्ये ‘मसाला बाँड’ प्रकरणाची चौकशी चालू केली आणि वर्ष २०२४ मध्ये आयझॅक यांना चौकशीसाठी समन्स बजावले. विशेष म्हणजे, आयझॅक यांनी दोन समन्स दुर्लक्षित केले. यावर ईडीने आक्षेप घेतला होता.
विरोधकांकडून टीका !
राज्यातील विरोधकांनी असे म्हटले आहे की, डाव्या लोकशाही आघाडी सरकारने वित्तीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी मुख्यमंत्री विजयन् आणि ‘केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डा’चे प्रमुख यांच्यावर व्यापक आर्थिक अनियमिततेचा आरोप केला. काँग्रेसचे आमदार व्ही.डी. सतीसन् यांनीही ‘केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डा’च्या कर्ज घेण्याच्या पद्धतींवर आक्षेप घेतला.
संपादकीय भूमिकासाम्यवादी गुन्हेगारीपासून ते भ्रष्टाचारापर्यंतच्या कृत्यांत नेहमी पुढे असतात, हे दर्शवणारी घटना ! असे समाजघातकी सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हेच देशहिताचे आहे ! |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !