तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आल्याची अधिसूचना पाक सरकारने अद्यापही प्रसारित केली नाही !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये २७ वी घटनादुरुस्ती करून सैन्यदलप्रमुख आसिम मुनीर यांना देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ (तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख) बनवण्यात आले; मात्र त्याची अधिसूचना अद्याप काढण्यात आलेली नाही. हा आदेश २९ नोव्हेंबरपर्यंत प्रसारित करणे अपेक्षित होते; मात्र तसे झालेले नसल्याने तांत्रिकदष्ट्या मुनीर निवृत्त सैन्याधिकारी झाल्याचे म्हटले जात आहे. अधिसूचना न काढण्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ देशात उपस्थित नसणे, हे कारण आहे. ते लंडन येथे गेले आहेत.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार शाहबाज शरीफ यांनी जाणूनबुजून स्वतःला या प्रक्रियेपासून दूर ठेवले, जेणेकरून त्यांना आसिम मुनीर यांच्या मुदतवाढीवर किंवा ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ नियुक्तीच्या आदेशावर स्वाक्षरी करावी लागू नये. हे पद मिळताच मुनीर यांच्या हातात पाकच्या अणूबाँबचे नियंत्रण येणार आहे.
अधिसूचनेची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे ! – संरक्षणमंत्री
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, सीडीएफ्च्या अधिसूचनेची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. लवकरच अधिसूचना प्रसारित करण्यात येईल.
मुनीर काहीही करू शकतात ! – तिलक देवेशर
या संदर्भात भारताच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य तिलक देवेशर यांनी दावा केला की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जाणूनबुजून असे केले. आसिम मुनीर त्यांची शक्ती दाखवण्यासाठी भारताविरुद्ध कोणताही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. मुनीर आता सैन्यदलप्रमुख आहेत कि नाही ?, हे अधिकृतपणे स्पष्ट नसले, तरी त्यांचा इतका प्रभाव आहे की, ते काहीही करू शकतात. पाकिस्तानला स्वतःलाच याविषयी निश्चिती नाही की, सैन्यदलप्रमुख कोण आहे ? जर मुनीर यांच्या मनात भारतावर दबाव आणण्याचा किंवा कोणतीही घटना भडकवण्याचा विचार आला, तर परिस्थिती आणखी धोकादायक होईल.
मुनीर आणि शाहबाज शरीफ यांच्यात करार : इम्रान खान यांचा ‘निकाल लावण्या’ची अट
आसिम मुनीर यांना तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख करण्याच्या बदल्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचा लंडन येथे रहाणारे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुनीर यांच्याशी करार केला असल्याचा दावा पाकमध्ये केला जात आहे. या कराराच्या अंतर्गत मुनीर यांना तिन्ही दलांचा प्रमुख करतांना त्यांनी सध्या पाकच्या कारागृहात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजकारणातून बाहेर करण्यासाठी प्रयत्न करावा, किंवा त्यांना देशातून बाहेर काढावे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यांना ‘दूर’ करावे, अशी अट ठेवलेली आहे. त्यातूनच इम्रान खान जिवंत आहेत कि नाही ?, हे स्पष्ट झालेले नाही. खान यांना भेटण्यासाठी कुणालाही अनुमती दिली जात नसल्याने आंदोलनही केले जात आहे.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी