वर्ष २०१२ मध्ये पोलिसांच्या वाहनावर बाँब फेकल्याचे प्रकरण

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पय्यनूर नगरपरिषद निवडणुकीतील सध्याचे उमेदवार असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकपच्या) व्ही.के. निशाद आणि टी.सी.व्ही. नंदकुमार या २ कार्यकर्त्यांना वर्ष २०१२ मध्ये पोलिसांच्या वाहनावर बाँब फेकल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने या दोघांना खुनाचा प्रयत्न आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. दोघांवर अडीच लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना आणखी एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल.
🔥 Red Alert: When Slogans Rise for Bombers… and for Naxalites 🔥
DYFI–CPI(M) workers K. Nishad and T. C. V. Nandakumar have been sentenced to 20 years in prison for throwing a bomb at a police vehicle in 2012.
Yet shockingly, videos showing cadres shouting slogans in support… https://t.co/E5TtOBukpb pic.twitter.com/uHbhRcC3Bp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 2, 2025
१. निशाद आणि नंदकुमार दोघेही माकपच्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेचे सदस्य आहेत. निशाद हे पय्यनूर नगरपरिषदेतल्या मागील कार्यकाळातील सदस्यही आहेत.
२. १ ऑगस्ट २०१२ या दिवशी इंडियन युनियन मुस्लिम लीगचे कार्यकर्ते अरियिल शुक्कूर यांच्या खुनाच्या प्रकरणात माकपचे तत्कालीन जिल्हा सचिव पी. जयराजन् यांना अटक झाल्यानंतर ही घटना घडली. त्या वेळी या दोघांनी पोलिसांच्या वाहनावर बाँब फेकले. सुदैवाने बाँब फुटले नाहीत आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संपादकीय भूमिकाआता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर हा राजकीय पक्ष नाही, तर देशद्रोही, आतंकवादी आणि नक्षलवादी कारवाया करणारा पक्ष असल्याने त्याच्यावर बंदी घालणेच योग्य आहे ! |
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले