
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘कधी येशील मनमोहना ।’ हे गीत रचले आहे. वर्ष १९९९ मध्ये त्या गीताच्या शेवटी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आणखी काही ओळी जोडल्या. त्यांनी शेवटच्या ओळीत ‘तो पहा आला मोहन ।’ , असे लिहिले आहे. या ओळींतून त्यांनी ‘धर्मसंस्थापनेसाठी मोहन आला आहे’, असे सूचित केले आहे.
त्यांनी स्वतः असे लिहून त्या माध्यमातून साधकांना आश्वस्त केले आहे आणि ‘तो मोहन म्हणजे कोण आहे ?’, याची अनुभूतीही साधकांनी घेतली आहे. (टीप) परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रसंगांतून साधकांना आश्वस्त केले आहे. त्यातीलच हा एक प्रसंग आहे. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(टीप : ‘महर्षींनी नाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असा उल्लेख केला आहे.’ – संकलक)
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२५)
|
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद