
वॉशिंग्टन (अमेरिका) – ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात कर लागू करूनही एप्रिल-ऑक्टोबर २०२५ या दोन तिमाहींचा विचार करता भारताची निर्यात वाढलीच आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली. मंत्रालयाने ही माहिती संसदीय वाणिज्य स्थायी समितीला दिली. अमेरिकेच्या आयात कर वाढीनंतर त्याचा ‘भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम झाला ?’ याचा आढावा घेण्यासाठी ही सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
वाणिज्य मंत्रालय २ आठवड्यांच्या आत स्थायी समितीसमोर सविस्तर लेखी अहवाल सादर करील. भारताच्या अमेरिकेतील निर्यातीत मागील महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात १४.५ टक्के वाढ झाली आहे. २७ ऑगस्टला भारताविरुद्ध अमेरिकेने कर लागू केल्यानंतर सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या निर्यातीत घट झाली; परंतु ऑक्टोबरमधील वाढीकडे पहाता देशाच्या आर्थिक विकासाच्या भवितव्यास सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण