|

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाच्या सरकारने इराणच्या राजदूताला ७ दिवसांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तसेच इराणच्या सैन्यदलाची शाखा असलेल्या ‘इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (आय.आर्.जी.सी.)ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे.
🇦🇺 Australia cracks down on IRGC 🇮🇷🔥
Declares Iran’s Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) a terrorist organisation 🚫
Australia orders Iran’s ambassador to leave within 7 days ⏳
🕍 Reportedly linked to plots targeting the Jewish community
💥 Recent Sydney & Melbourne… pic.twitter.com/suQ3gD7zLl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 27, 2025
द्वितीय महायुद्धानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाने एखाद्या देशाच्या राजदूताला देशाबाहेर काढले आहे. ‘आय.आर्.जी.सी.’ने ऑस्ट्रेलियातील यहुदी समाजावर आक्रमणाची योजना आखली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर संस्थांनी सांगितले.
१. ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडनीतील ‘लुईस कॉन्टिनेन्टल किचन’ येथे आक्रमण झाले होते आणि डिसेंबर २०२४ मध्ये मेलबर्नमधील अदास इस्रायल सभास्थानावर आक्रमण झाले होते. या दोन्ही घटना संघटित आतंकवादी आक्रमणे असल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले होते. गुप्तचर अहवालानंतर ‘आय.आर्.जी.सी.’ला आतंकवादी घोषित करण्यात आले.
२. हा निर्णय अमेरिकेच्या आणि युरोपच्या धोरणांशी सुसंगत आहे; कारण अमेरिकेने आधीच ‘आय.आर्.जी.सी.’ला ‘विदेशी आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे.
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!