
पुणे – लोहगाव विमानतळावरील स्थानिक कर्मचार्यांनी २५ नोव्हेंबरच्या पहाटे पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला दिली. त्यामुळे वन विभागाने विमानतळावर नवे ५ ‘ट्रॅप कॅमेरे’ (हालचाल ओळखणारे छायाचित्रक) बसवले. बिबट्याला पकडण्यासाठी आता विमानतळ परिसरात एकूण ८ कॅमेरे आणि ३ पिंजरे लावलेले आहेत. लोहगाव विमानतळ परिसरात बिबट्या अनेक दिवसांपासून लपला असून तो अधूनमधून लोकांना दिसतो. पुणे परिक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी, ‘रेस्क्यू संघटने’चे सदस्य, भारतीय हवाई दलाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
पुणे विद्यापीठ परिसरात ‘जागते रहो’चा परिपत्रकाद्वारे संदेश !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा वावर असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठाच्या सुरक्षा विभागाने ‘जागते रहो’ परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ परिसरात रहाणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सतर्क रहावे. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडणे टाळा. सामाजिक प्रसामाध्यमांतील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन विद्यापिठाच्या सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले यांनी केले आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान