डॉ. थुप्पिल वेंकटेश हे एक अत्यंत अनुभवी आणि सुप्रसिद्ध ‘बायोकेमिस्ट’ (जीवरसायनशास्त्रज्ञ) आहेत. त्यांनी ‘बायोकेमिस्ट्री’मध्ये (जीवरसायनशास्त्रामध्ये) ‘पीएच्.डी.’ (विद्यावाचस्पति) प्राप्त केली आहे. ते बेंगळुरू येथील सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज येथे ‘बायोकेमिस्ट्री’ आणि ‘बायोफिजिक्स’ (जैविक भौतिकशास्त्र) विभागाचे सन्माननीय प्राध्यापक आहेत. ते ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (क्यूसीआय)चे मुख्य सल्लागार आहेत. ते ‘इंडियन सोसायटी फॉर लेड अवेअरनेस अँड रिसर्च’चे संस्थापक आहेत, जी संस्था शिशाच्या (लीड) धोक्यांविषयी जागृती करण्याचे काम करते. याकरताच त्यांना ‘लीड मॅन ऑफ इंडिया’ असेही म्हणतात.

डॉ. वेंकटेश यांच्या संशोधनानुसार मानवी शरिरात शिसे जाण्याचे प्रमुख मार्ग
अ. घरांचे जुने रंग विशेषतः वर्ष १९९० पूर्वी लावलेल्या रंगांमध्ये, विशेषतः पिवळ्या आणि लाल रंगात शिशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे.

आ. जुन्या पाईपलाईनमध्ये वापरलेले शिशाचे पाईप्स किंवा तांब्याचे पाईप जोडण्यासाठी वापरलेले ‘लेड सोल्डर’ यातून शिसे पाण्यात मिसळते.

इ. स्थानिक बाजारपेठेत मिळणारी आणि ‘नॉन-ब्रँडेड’ (नामांकित नसलेले उत्पादन) रंगीत खेळणी, जी मुले तोंडात घालतात. त्यांच्या रंगात शिशाचे प्रमाण असू शकते.

ई. हळदीला आकर्षक गडद पिवळा रंग येण्यासाठी त्यात ‘लेड क्रोमेट’ नावाचे अत्यंत विषारी रसायन मिसळले जाते, जे आपल्या स्वयंपाकघरातून थेट पोटात जात असते.
उ. वापरलेल्या ‘लीड-ॲसिड बॅटरी’ (उदाहरणार्थ कार, इन्व्हर्टर बॅटरी) यांचे अशास्त्रीय पद्धतीने होणारे ‘रिसायकलिंग’. यामुळे शिसे थेट मातीत, पाण्यात आणि हवेत मिसळते अन् आपल्या शरिरात जाते.
ऊ. काही प्रकारच्या कुंकू किंवा सिंदूरला गडद लाल रंग देण्यासाठी ‘रेड लेड’ या शिशाच्या संयुगाचा वापर केला जातो.
ए. जे लोक ‘पेंटिंग’ (रंगकाम) करणे, वेल्डिंग करणे, बॅटरीच्या कारखान्यात काम करणे किंवा शिशाच्या खाणीत काम करतात, त्यांना श्वासावाटे थेट आणि मोठ्या प्रमाणात शिशाचा संसर्ग होतो.
ऐ. पूर्वी भारतात ‘शिसेयुक्त पेट्रोल’ वापरले जात होते. त्या गाड्यांच्या धुरांड्यातून बाहेर पडलेले शिसे आजही रस्त्यांच्या कडेला मातीत आणि धुळीत मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.
| SHOCKING !! 1.5 Million Deaths Due To Lead? | Thuppil Venkatesh on Body To Beiing- Shlloka
(सौजन्य : SHLLOKA CLIPS) |
रसायुर्वेदाच्या उपचारांचा लाभ घ्या !
पण…वैद्यक जिहादींना मात्र शिसे शरिरात जाण्यासाठी या सार्यांच्या तुलनेत अत्यंत नगण्य असलेले कारण, म्हणजे आयुर्वेदाची औषधे हीच एकमेव दोषी वाटत असतात बरे ! लक्षात घ्या, जेमतेम ०.५ टक्के इतक्याच रसायुर्वेदाच्या औषधांत, तेही मानवी शरिरात वैद्यांच्या देखरेखीने घालण्यास योग्य असलेल्या शिसे भस्माचा (कच्चे शिसे नाही !) वापर होतो. बहुतेक वैद्य ते वापरतच नाहीत किंवा अत्यंत अल्प मात्रेत आणि अत्यंत अल्प काळासाठी वापरतात.
या तुलनेत वरील सारे घटक स्वतःच्या आजूबाजूला लक्षणीय प्रमाणात उपलब्ध असतात, हे कुणाही सूज्ञ व्यक्तीला सहज लक्षात येईल. तरीही आपण वैद्यक जिहादींच्या अपप्रचाराला भुलतो आणि ज्यात शिशाचा वापरच नाही, अशा स्वतःला लाभदायक रसायुर्वेदाच्या उपचारांना टाळतो आणि पर्यायाने स्वतःच्या आरोग्याची हानी करून घेतो !
डोळे उघडा !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१७.११.२०२५)
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले
आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
गुडघेदुखी आणि जळू !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !