चोरट्यांनी स्वतः रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवले !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील जयनगर भागात भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून चोरट्यांच्या एका टोळीने ए.टी.एम्.मध्ये भरण्यासाठी नेण्यात येणारे ७ कोटी रुपये लुटले. जयनगर भागातील अशोक स्तंभाजवळ १८ नोव्हेंबरला भरदिवसा ही घटना घडली.
🚨 Bengaluru ATM Cash Heist!
Thieves posing as RBI officials looted a staggering ₹7 crore that was en route to load ATMs! 😳💸
Under the Karnataka Congress regime, one is forced to ask: Does “Law & Order” even exist anymore? 🤦♂️
A total shame for both the Police and the… pic.twitter.com/fQTMEPapA3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 21, 2025
एच्.डी.एफ्.सी. बँकेच्या जेपी नगर शाखेतून सी.एम्.एस्. कंपनीचे वाहन ही रक्कम ए.टी.एम्.मध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते. अशोक स्तंभाजवळ इनोव्हा या वाहनातून आलेल्या चोरट्यांनी रक्कम असलेल्या गाडीचा मार्ग अडवला. स्वतः रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून कागदपत्र आणि रोकड पडताळणीचे कारण देत चोरट्यांनी कर्मचार्यांना वाहनाबाहेर काढले. क्षणात त्यांनी वाहन आणि रक्कम स्वतःच्या कह्यात घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी सी.एम्.एस्.चे कर्मचार्यांना स्वतःच्या वाहनात बसवले आणि रक्कमही स्वतःच्या इनोव्हा गाडीत घेऊन डेअरी सर्कलच्या दिशेने निघाले. नंतर त्यांनी कर्मचार्यांना उड्डाणपुलावर उतरवले आणि बॅनरघट्टा रोडकडे वेगात निघून गेले.
दक्षिण विभागीय पोलिसांनी शहरभर नाकेबंदी केली असून जयनगर, डेअरी सर्कल आणि बॅनरघट्टा रोड येथील सीसीटीव्ही चित्रिकरण पडताळण्यात येत आहे. पोलिसांनी या संघटित टोळीचा शोध घेण्यासाठी मोहीम चालू केली आहे.
संपादकीय भूमिका‘कर्नाटकामधील काँग्रेसच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार अस्तित्वात आहे का ?’, असा प्रश्न पडतो ! पोलीस आणि सरकार यांना हे लज्जास्पद ! |

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !