Pakistan Zindabad NCP Event : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा-कळवा अध्यक्ष शमीम खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

  • ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे प्रकरण

  • आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर घडला प्रकार !

डावीकडे घोषणा देताना शमीम खान

मुंब्रा (जिल्हा ठाणे) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा-कळवा अध्यक्ष शमीम खान यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी शमीम खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. शमीम खान यांनी पहलगाम आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ९ महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे पाकिस्तानविरुद्ध निषेध मोर्चा काढला होता. त्यात माजी मंत्री आणि मुंब्रा कळवा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक सहभागी झाले होते.

या वेळी शमीम खान यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ऐवजी ‘पाकिस्तान झिंदाबाद’अशी घोषणा दिली. काही वेळाने हे लक्षात आल्यावर त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणा दिली. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी ! – आमदार निरंजन डावखरे, भाजप

आमदार निरंजन डावखरे

मोर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. त्यांच्या समोर हा प्रकार घडला. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंद करायला हवा, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आला  आहे.

हिरवे संकट रोखण्यासाठी वेळीच सिद्ध झाले पाहिजे ! – आमदार संजय केळकर, भाजप

आमदार संजय केळकर

जे पोटात असते, ते ओठात येते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समोर ही घटना घडून राज्यघटना, राष्ट्रभक्तीची भाषा करणार्‍या आव्हाड यांनी याविषयी काहीच केले नाही. त्यामुळे गुन्हा नोंद करावा लागला. राष्ट्रभक्त नागरिकांनी जागृत राहून हे हिरवे संकट वेळीच रोखण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, तसेच अशांना पक्षातून काढले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • आमदार जितेंद्र आव्हाड यांना घोषणा चुकत असल्याचे लक्षात कसे आले नाही कि त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून मुसलमानप्रेमाचा उमाळा दर्शवला ? ‘देशद्रोहाचे समर्थन होत असतांनाही ते न रोखणार्‍या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई व्हायला हवी’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
  • पाकिस्तानचा उदोउदो करणारे नेते असलेल्या राजकीय गटाला त्याच्या नावात ‘राष्ट्रवादी’ हा शब्द वापरण्याचा अधिकार आहे का ? अशांवर या गटाने कुठली कारवाई केली ? कि या गटालाही हे कृत्य मान्य आहे ?