
मुंबई – ‘मुंबई क्लायमेट वीक’चे (‘मुंबई हवामान सप्ताहा’चे) आयोजन मुंबईमध्ये १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या काळात केले जाणार आहे. याचा उद्देश स्वच्छ पर्यावरणासाठी नागरिकांची चळवळ चालू करणे, हवामान पालटाविषयी जागरूकता वाढवणे आणि थेट नागरिकांपर्यंत व्यावहारिक, कृतीशील उपाययोजना पोचवणे हा आहे. रहिवासी संस्था, शाळा, महाविद्यालये, महिला गट, आघाडीचे कामगार आणि तरुण, भागधारक यांचा यात सक्रीय सहभाग असेल. यात ३० हून अधिक राष्ट्रांतील प्रतिनिधींना एकत्र आणण्यात येणार आहे, अशी माहिती प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी दिली.
या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच स्थळापुरते मर्यादित रहाणार नाही. ‘hub-and-spoke’ मॉडेलचा वापर करून संपूर्ण मुंबईत उपक्रम पसरवले जातील. मोकळे पटांगण, शाळा, महाविद्यालये, उद्याने आणि सार्वजनिक जागा येथे कार्यक्रम आयोजित केले जातील. नागरिकांना वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम, जागरूकता रॅली, पथनाट्ये, माहितीपटाचे सादरीकरण, हवामान आरोग्य शिबिरे आणि कौशल्य विकास कार्यशाळा यांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !