
तंजावूर (तमिळनाडू) – अलीकडेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी तंजावूर येथील कलांचेरी येथे असलेल्या ‘श्री वेदविद्या गुरुकुलम्’ला भेट दिली. तेथे त्यांनी वेदप्रचाररत्नम् ज्योतिष विद्यारत्नम् जी.के. सीतारामन् शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबरला होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.

सीतारामन् शास्त्री यांचे पूर्वज प्राचीन सोमनाथ शिवलिंगाच्या अवशेषांचे आदरणीय संरक्षक होते. भेटीच्या प्रसंगी श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनी पवित्र शिवलिंगाला अभिषेक केला आणि या दिव्य वारशाच्या वंशावळी अन् महत्त्व यांविषयी जी.के. सीतारामन्जी यांच्याशी आध्यात्मिक संवाद साधला.

वेदकुलपती जी.के. सीतारामन्जी यांनी महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारले असून ते पवित्र सोमनाथ शिवलिंगाचे अवशेषही महोत्सवासाठी आणणार आहेत. यामुळे भाविकांना या पवित्र वारशाचे साक्षीदार होता येईल.
Ancient Somnath Shivlingam relics to be showcased at Delhi’s Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav
ShriChitshakti (Mrs.) Anjali Mukul Gadgil visited Kalancheri in Thanjavur to meet Vedaprachararatnam Jyotish Vidyaratnam G. K. Seetharaman Sastry, whose lineage has long safeguarded… pic.twitter.com/sXno0AeW2q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2025
राजस्थान येथील प्रसिद्ध मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सिद्धपीठाधीश्वर श्रीनरेशपुरी महाराज यांना निमंत्रण !![]() श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मेहंदीपूर बालाजी मंदिराला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी सिद्धपीठाधीश्वर श्रीनरेशपुरी महाराज यांनाही महोत्सवाचे निमंत्रण दिले.
|

Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !