(म्हणे) ‘आम्ही कुठल्या प्रकारच्या कट्टरतावादी कारवायांमध्ये सहभागी नाही !’ – तुर्कीयेचे स्पष्टीकरण

 देहली बाँबस्फोटात तुर्कीयेचे नाव आल्यावर त्याचे स्पष्टीकरण

अंकारा (तुर्कीये) – देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणातील आतंकवादी डॉ. उमर आणि डॉ. मुजम्मिल हे तुर्कीये येथे पूर्वी गेले होते, असे उघड झाल्यानंतर चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कीयेने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, तुर्कीये भारत किंवा इतर कोणत्याही देशाला लक्ष्य करणार्‍या कट्टरतावादी कारवायांमध्ये कोणत्याही प्रकारे वा स्वरूपात सहभागी नाही. हे दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत आणि त्यांना कोणताही तथ्यात्मक आधार नाही.

१. डॉ. उमर आणि मुजम्मिल यांना तुर्कीयेला जाण्यासाठी जैश-ए-महंमदकडून साहाय्य करण्यात आल्याचा संशय आहे. हे दोघेही ‘टेलिग्राम’ आणि ‘सिग्नल’ यांसारख्या ‘ॲप्स’चा वापर करत होते. त्यांना यांद्वारे सूचना मिळाल्या आणि त्यानंतर ते तुर्कीयेला गेले.

२. सूत्रांनुसार डॉ. मुजम्मिल याने दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-महंमदसमवेतच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी ज्या हँडलरशी (हस्तकाशी) संवाद साधला त्याचे नाव ‘अबू उकासा’ होते. वर्ष २०२२ च्या बैठकीसाठी तुर्कीये हे ठिकाण निवडण्यात आले होते, जेणेकरून देशाच्या सुरक्षायंत्रणांना संशय येऊ नये.

संपादकीय भूमिका

  • ‘होय, आम्ही भारतातील बाँबस्फोटांमध्ये सहभागी आहोत’, असे तुर्कीये कधीतरी म्हणेल का ? त्यामुळे तो पाकिस्तानप्रमाणेच खोटे बोलणार !
  • पाकिस्ताननंतर आता तुर्कीये भारतात आतंकवादी कारवाया करण्यासह  पाकला सैनिकी साहाय्य पुरवू लागला आहे. त्यामुळे भारताने त्याच्याविषयी आताच ठोस निर्णय घेऊन कृती करणे आवश्यक आहे !