|

इस्लामाबाद (पाकिस्तान) / काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानसह चालू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तालिबानने पाकसमवेत व्यापार थांबवण्याची सिद्धता चालू केली आहे. त्याने सर्व अफगाण व्यापार्यांना पुढील ३ महिन्यांत पाकशी सर्व व्यापार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तालिबानचे अर्थविषयक उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी व्यापारी, तसेच अर्थ मंत्रालयाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन हे निर्देश दिले, तसेच पाकऐवजी व्यापारासाठी पर्यायी मार्ग शोधण्यासही सांगितले. यासह पाककडून औषधे आयात करण्यास कुणालाही अनुमती न देण्याचे निर्देशही दिले. या वक्तव्यानंतर पाकमध्ये खळबळ उडाली आहे.
🚫🇦🇫 Taliban to Afghan Traders: Stop all trade with Pakistan within 3 months
🇵🇰 🍽️ A starving Pakistan is headed for an even deeper economic crisis.
🔥 In such a situation, will Pakistan still dare to go to war with Afghanistan?
A financially collapsing Pakistan will struggle… pic.twitter.com/DzIOPupFY7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2025
(म्हणे) ‘पाकला लाभच होणार !’ – पाकच्या संरक्षणमंत्र्यांची थाप
दुसरीकडे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘अफगाणिस्तानशी व्यापार थांबला, तर त्याचा पाकवर कोणताच परिणाम होणार नाही’, असा दावा केला. ते म्हणाले की, अफगाणिस्तानकडून येणार्या मालाची स्थानिक बाजारात काहीच आवश्यकता नसते. जेव्हा अफगाणिस्तानहून होणारा व्यापार न्यून होईल, तेव्हा त्या आडून पाकमध्ये येणारे आतंकवादी न्यून होतील. यातून पाकचाच लाभ होईल.
पाकमधील ‘सरहद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष इंजिनीअर मंजूर इलाही यांनी यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे उपस्थित करून संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांना घरचा अहेर दिला. |
ते म्हणाले की,
१. अफगाणिस्तानशी व्यापार बंद झाला, तर पाकलाच अधिक तोटा होईल. पाक अफगाणिस्तानला औषधे पुरवतो; परंतु इराण आणि भारत हे त्यांना स्वस्त दरात औषधे पुरवतात.
२. उज्बेकिस्तान आणि रशिया हे अफगाणिस्तानला साखर पुरवतात. अफगाणिस्तानला पाकची कोणतीच आवश्यकता नाही; पण आम्हाला त्यांची आहे.
३. इराण आणि तुर्कीये यांनी अफगाणिस्तानातील आमच्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळवले आहे. अफगाणिस्तान आता उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान, रशिया आणि युक्रेन यांच्याकडून वस्तू आयात करतो. गेल्या ४ वर्षांत आधीच पाकने अफगाणिस्तानमधील ६५ टक्के बाजारपेठ गमावली आहे.
४. पाकिस्तान केवळ अफगाण बाजारच नाही, तर मध्य आशियातील बाजारपेठाही गमावेल.
संपादकीय भूमिकाअसे असतांना हाच पाक अफगाणिस्तानसमवेत युद्ध करणार ? आर्थिक फटका बसलेला पाक सैनिकीस्तरावरही मार खाऊनच रहाणार ? |
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !