
कोल्हापूर, १० नोव्हेंबर – ‘मन:शक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा’च्या वतीने मनशक्ती सुवर्ण महोत्सवाच्या अंतर्गत यश शांतीसाठी ११ आणि १२ नोव्हेंबरला ‘न्यू वे’ उपक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था येथे होत आहे, असे मन:शक्ती प्रयोग केंद्र यांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
या संपूर्ण उपक्रमामध्ये ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन, पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र, विद्यार्थी आणि युवक यांच्यासाठी अभ्यास मार्गदर्शनपर सत्र होणार आहेत. मनाची एकाग्रता, स्थिरता आणि सृजनशीलता वाढवणार्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, प्रत्यक्ष हाताळण्याजोगे आकर्षक आणि अभिनव खेळ, तसेच मेंदू विकासासाठी घरी घेऊन जाता येतील अशी शैक्षणिक छोटी ‘मॉडेल्स’ (प्रकल्प) पहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. तरी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला