‘पुणे येथील साधिका सौ. शांभवी चोपदार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता पुष्पांजली येथे दिली आहे.

‘स्वेच्छा, परेच्छा, ईश्वरेच्छा ।
साधनेत तुम्ही समजावले
त्यागच चांगला ॥ १ ॥

तन, मन आणि धन सर्व तव चरणी अर्पण ।
साधनेत तुम्ही शिकवले समर्पण ॥ २ ॥
मोह, माया, राग, द्वेष निर्मूलन ।
साधनेत तुम्ही शिकवले अहं निर्मूलन ॥ ३ ॥
मनात सदैव आता एकच ध्यास गुरुदेव ।
साधनेत सदैव राहो गुरुचरणांचे स्मरण ॥ ४ ॥
‘माझे गुरुदेव, माझे गुरुदेव’ हाच मनी भाव ।
अखंड भारतभूवरी होत आहे तुमचा कृपावर्षाव ॥ ५ ॥
सदैव धरिला हात माझा, राहो माझी शरणागती ।
गुरुमाऊली(टीप), तुझिया चरणी कृतज्ञता !
कृतज्ञता ! कृतज्ञता !’ ॥ ६ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.’
– सौ. शांभवी चोपदार, वल्लभनगर, पुणे. (८.७.२०२५)
| या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !