१३ ते १४ डिसेंबर या दिवशी होणार महोत्सव !

नवी देहली, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – सनातन राष्ट्राचे पुर्नवैभव प्राप्त करणे, त्यासाठी सांस्कृतिक वारसा जपणे आणि टिकवणे, तसेच राष्ट्राची सुरक्षा आदी विविध विषयांवर चर्चेद्वारे पथदर्शन निश्चित करण्यासाठी देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संतगणांसह विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती, राष्ट्र, धर्म आणि हिंदुत्व यांसाठी कर्तव्यभावनेने कार्यरत असलेले राष्ट्र-धर्मप्रेमी या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत. या महोत्सवाचे विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार आहे.
१३ डिसेंबर या दिवशी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलवाद आणि आतंकवाद या समस्यांविषयी मार्गदर्शन, तसेच सनातन संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन आदी विषयांवर विविध क्षेत्रांतील मान्यवर विचार मांडणार आहेत. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी या महोत्सवाला आशीर्वाद दिले आहेत.
महोत्सवाचे वैशिष्ट्यछत्रपती शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीचे दर्शन, तसेच त्यांच्या काळात वापरण्यात आलेल्या विविध शस्त्रांचे प्रदर्शन, हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी ‘या प्रदर्शनाला समस्त राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी भेट द्यावी’, असे आवाहन केले आहे. |
विविध मान्यवरांना निमंत्रण !
१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेऊन त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सावा’चे निमंत्रण दिले.

२. हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे आणि ‘भारत जागरण परिषदे’चे संस्थापक श्री. अंकित कोठारी यांनी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.


३. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री. राजीव खांडेकर आणि ‘एबीपी न्यूज’च्या डिजिटल विभागाचे प्रमुख तुषार बनर्जी यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.

४. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी देहली येथील‘ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती’चे मुख्य कार्यवाह कर्नल मोहन काकटीकर (निवृत्त) यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !