बागा आणि हडफडे येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे फलक झळकल्याचे प्रकरण

म्हापसा, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील बागा आणि हडफडे येथील २ वेगवेगळ्या दुकानांबाहेर लावलेल्या ‘एल्.ई.डी.’ (आधुनिक विद्युत्दिवे) फलकांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण नुकतेच झळकले होते. या पार्श्वभूमीवर कळंगुट पंचायतीने पंचायत क्षेत्रातील अनधिकृत ‘एल्.ई.डी.’ फलक पुढील ३ दिवसांत हटवण्याचा आदेश दिला आहे, तर हडफडे पंचायतीने ज्या दुकानाच्या बाहेरील फलकावर हे लिखाण आढळले होते, त्या दुकानाचा परवाना रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
१. कळंगुट पंचायतीचे सरपंच जोसेझ सिक्वेरा म्हणाले, ‘‘७ नोव्हेंबर या दिवशी मी आणि पंचायतीचे अन्य सदस्य यांनी पंचायत क्षेत्रातील अनधिकृत ‘एल्.ई.डी.’ फलकांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानंतर अनधिकृत ‘एल्.ई.डी.’ फलक हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याचे पालन न केल्यास संबंधित दुकाने आणि आस्थापने यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे.’’
२. हडफडे-नागोवा पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर म्हणाले, ‘‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण ज्या मद्य विक्री करणार्या दुकानाबाहेर प्रदर्शित झाले, त्या दुकानाचा परवाना रहित करण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला आहे. हा परवाना प्रथम सावियो नावाच्या व्यक्तीला दिला होता. नंतर तो त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थलांतर करण्यात आला. सध्या हे दुकान एक परप्रांतीय चालवत असून ते अनधिकृत आहे. या प्रकरणी आम्ही अबकारी कार्यालयाला पत्र लिहून कारवाई करण्याची सूचना केली आहे.’’
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप