‘वन्दे मातरम्’ राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने विशेष संपादकीय…!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी शक्ती देणारा महामंत्र म्हणजे ‘वन्दे मातरम्’ ! समर्थक, विरोधक आणि तटस्थ या सर्वांना ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र ठाऊक आहे. तसे पाहिले तर, या शब्दाचा अर्थ आहे, ‘मी मातेला वंदन करतो’; पण हा अर्थ नुसता उच्चारणे वेगळे आणि ‘वन्दे मातरम्’ असा उद्घोष करणे वेगळे ! ‘हा उद्घोष करताच आजही राष्ट्राभिमानी नागरिकांच्या अंगावर रोमांच उभे रहातात, तर देशविरोधक, धर्मांध, साम्यवादी, कथित पुरोगामी यांच्या पायाखालची भूमी सरकते आणि त्यांच्यातील शत्रुत्व जागे होते’, हेच मंत्राचे सामर्थ्य असते.

‘हर हर महादेव’, ही घोषणा ऐकली, तरी रणांगणात उतरल्यासारखे वाटते ! ‘वन्दे मातरम्’ ही घोषणा करण्यासह हे राष्ट्रगीत म्हटल्यास भारतमाता तर साक्षात् समोर उभी रहातेच; पण हाच उद्घोष ऐकून धर्मांध चवताळतात. आज हाच उद्घोष राष्ट्रभक्तांना संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य स्थापण्याचीही प्रेरणा देत आहे.

आजच्या जागतिक पातळीवरील अशांततेच्या पार्श्वभूमीवर बंकिमचंद्र यांचे ‘वन्दे मातरम्’चे शब्द मनाला उभारी देणारे आणि शत्रूंना धडकी भरवणारे आहेत; म्हणूनच ज्यांची नाळ या भारतभूशी जोडलेली नाही, ते हे राष्ट्रीयगीत म्हणण्यास विरोध करतात. अशा धर्मांध प्रवृत्तींना सरकारने त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे, अन्यथा येणारा काळच अशा दुष्प्रवृत्तींना वठणीवर आणेल ! एकमात्र निश्चित की, पुन्हा एकदा संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर राष्ट्रप्रेमींना ‘वन्दे मातरम्’चीच आवश्यकता आहे !
संपादकीय : कथित स्त्रीवादाची रूपे !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !