रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. प्रा. (डॉ.) मेधा तापीआवाला, डीन (विद्याशाखेचे प्रमुख) – एस्.एन्.डी.टी. महाविद्यालय, रुनवाल ब्लीस, कांजुरमार्ग, मुंबई.

‘आश्रम पाहून पुष्कळ समाधान आणि शांती अनुभवता आली. आश्रमात चालणार्‍या कार्याचे पुष्कळ अप्रूप वाटले आणि एक अद्भुत असा विचार मनात आला, ‘आपणही या प्रवाहात लवकरच समाविष्ट होऊ.’ (१७.९.२०२५)

२. सौ. दर्शना इंदप, सानपाडा, नवी मुंबई.

‘जागो जागी असे आश्रम असावेत. त्यामुळे संसार सांभाळता सांभाळता आम्हालाही सेवा करता येईल. येथे येण्याची आणि सेवा करण्याची संधी मिळाली.’ (१७.९.२०२४)

३. श्री. राजेंद्र  शर्मा, प्रधान संपादक – ‘स्वदेश ज्योति’, शिवाजी नगर, भोपाळ.

‘याविषयीच्या अनुभवाची अभिव्यक्ती सांगणे कठीण आहे. हा आश्रम साक्षात् देवालय आहे. ज्या पवित्र और सात्त्विक ध्येयाच्या पूर्तीसाठी येथे काम केले जात आहे, हे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण  जगासाठी अत्यावश्यक आहे. हिंदूंना जागृत आणि संस्कारित करणारी आणि युग निर्माण  करणारी ही चळवळ (अभियान) आहे.’ (१३.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक