संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा देत फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे विधान !

हेलसिंकी (फिनलंड) – मी भारताचा प्रचंड प्रशंसक आहे आणि मला निश्चिती आहे की, भारत अमेरिकेनंतर आणि चीन समवेत पुढचा जागतिक महासत्ता देश ठरेल. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व देणे अत्यावश्यक आहे. जर भारताला हे स्थान दिले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची शक्ती आणि विश्वसनीयता सतत न्यून होत जाईल, असे विधान फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी केले आहे. रशिया आणि ब्रिटन यांसह अनेक देश भारताच्या सदस्यत्वासाठी उघडपणे समर्थन करत असले, तरी चीन त्याला विरोध करत आहे.
भारत सर्व प्रमुख राष्ट्रांशी संतुलित संबंध राखतो !
‘फर्स्ट पोस्ट’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत स्टब म्हणाले की,
१. भारत सध्या जगातील एखाद्या शक्तीशी बांधील रहाण्याऐवजी सर्व प्रमुख राष्ट्रांशी समान आणि सकारात्मक संबंध निर्माण करत आहे अन् ही भूमिका अत्यंत योग्य आहे.
भारताचा आकार, क्षमता आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव पहाता तो जे करतो, त्याचा जगाच्या घडामोडींवर दूरगामी परिणाम होतो.
Yesterday I gave an interview to Indian FirstPost Network-18.
India is an indispensable pilar of global south. India is the future – it has demography, technology and economic growth on it’s side. pic.twitter.com/YBkrnTZjRJ
— Alexander Stubb (@alexstubb) November 4, 2025
२. जागतिक व्यवस्थेच्या दृष्टीने बहुपक्षीय सहकार्यासह भारताची भूमिका वाढवणे आवश्यक आहे. मी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दोनदा हे सांगितले आहे की, सुरक्षा परिषदेचा विस्तार व्हायला हवा. तिच्या सदस्य संख्येत किमान दुपटीने वाढ झाली पाहिजे. भारतासारख्या देशाला अद्याप कायमस्वरूपी सदस्यत्व नाही, हे अत्यंत चुकीचे आहे.
आपल्याला दक्षिण अमेरिकेतून १ सदस्य, आफ्रिकेतून २ आणि आशियातून २ सदस्य निवडले पाहिजेत; कारण मी बहुपक्षीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. जर भारताला सुरक्षा परिषदेत स्थान दिले नाही, तर ही जागतिक संस्था अधिकच दुर्बल बनेल.
चीनचा भारताला विरोध
भारतासह ‘जी-४’ देश (भारत, जपान, जर्मनी आणि ब्राझिल) सतत सुरक्षा परिषदेतील सुधारणांची मागणी करत आहेत; परंतु चीन या पालटाचा विरोध करत आहे.
चीनला भीती आहे की, भारताला सदस्यत्व मिळाल्यास आशियातील त्याची सत्ता आणि प्रभाव न्यून होईल; म्हणूनच तो भारताच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे. याच अनुषंगाने पाकिस्तान चीनच्या सांगण्यावरून भारताविरुद्ध मोहीम राबवत आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !