‘गुरुकृपायोगानुसार साधना करून (सनातन संस्थेच्या माध्यमातून) साधक जिवांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे’, त्याबद्दल देवाने सुचवलेले विचार (दृश्य आणि स्पंदने यांच्या माध्यमांतून) पुढे दिले आहेत.

१. सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्याचे प्रमाण वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवास्पद असणे अन् त्यामागील कारणमीमांसा !
पृथ्वीवर अनेक आध्यात्मिक संस्था आहेत. त्यांचा उद्देश ‘सनातन धर्मकार्य करणे आणि मोक्षप्राप्ती करणे’, हाच असूनही त्या संस्थांचा तुलनात्मक अन् अभ्यासात्मक विचार केला असता ‘सनातन संस्थेत साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्याचे प्रमाण वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवास्पद आहे’, हे लक्षात आले. त्याची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे आहे.

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘साधकांनी अर्जित केलेली ऊर्जा ईश्वरप्राप्तीसाठीच सत्कारणी कशी लावायची ?’, याविषयी शिकवणे : सर्वच संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था या त्यांचे शिष्य किंवा साधक यांना साधना शिकवतांना नामजपाच्या समवेत भक्तीयोग, ध्यानयोग, कर्मयोग इत्यादी मार्गांची शिकवण देतात. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना वरील मार्गांची शिकवण देण्यासह अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे ‘साधकाने अर्जित केलेली ऊर्जा ईश्वरप्राप्तीसाठीच सत्कारणी कशी लावायची ?’, याविषयी शिकवले आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शोधलेली स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने आणि त्यांनी सांगितल्यानुसार भावजागृतीसाठी प्रयत्न केल्याने सनातनच्या साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होत असणे
‘साधना करून मिळवलेली ऊर्जा आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षप्राप्ती होण्यासाठी कशी उपयोगात आणायची ?’, याविषयी प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून लक्षात येते.
२ अ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे पुष्कळ कठीण असणे : गुरुदेव साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ‘व्यक्ती, परिस्थिती आणि प्रसंग’ या माध्यमांतून शिकवतात. व्यक्तीला स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे पुष्कळ कठीण आहे; कारण व्यक्ती तिच्या मागील अनेक जन्मांतील संस्कारांचे गाठोडे समवेत घेऊन आलेली असते. व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं तिच्याशी इतके एकरूप झालेले असतात की, व्यक्तीची ती ओळख बनलेली असते. एखाद्या व्यक्तीला तिचे स्वभावदोष सांगितल्यास तिला पुष्कळ त्रास होतो.
२ आ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ ही कुरुक्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेसमान असणे : गुरुदेवांनी साधकांच्या आध्यात्मिक अधोगतीचे मर्म ओळखून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केली आहे. ही प्रक्रिया कुरुक्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेसमान आहे. ऐन युद्धाच्या वेळी युद्धभूमीवर अर्जुन त्याच्यामधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे, तसेच मायेच्या आवरणामुळे युद्ध करण्यास सिद्ध नव्हता. तेव्हा भगवंताने त्याच रणभूमीवर काळाला स्तब्ध करून अर्जुनाकडून जणू प्रक्रियाच राबवून घेतली ! त्याला माया आणि ब्रह्म यांतील भेद दाखवून त्याचे चित्त शुद्ध करून त्याला युद्ध करायला (समष्टी सेवा करायला) प्रवृत्त केले. त्याचा परिणाम ते धर्मयुद्ध होऊन कौरवकुळाचा, म्हणजेच अधर्माचा नाश झाला. सध्या कलियुगात भेद इतकाच की, साधना करणार्या साधकांचे ‘मन’ हे कुरुक्षेत्र झाले आहे ! साधकांनी मनावरील स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण प्रक्रियारूपी भगवद्गीतेने दूर करायचे आहे.
२ इ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून अन् भावजागृती होण्यासाठी प्रयत्न करून साधकाची आध्यात्मिक उन्नती आणि समाजाची सर्वांगीण प्रगती होऊ शकणे : ‘साधकांना ही प्रक्रिया राबवणे सुलभ व्हावे’, यासाठी प.पू. गुरुदेव हे भूदेवी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून साधकांना ‘भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी सांगत आहेत. प्रत्येक सप्ताहात होणार्या भक्तीसत्संगामुळे कित्येक साधक अनेक कठीण प्रसंगांना सहजतेने सामोरे जात आहेत. (‘सध्या विचारण्याची वृत्ती’ या संदर्भातील दिशादर्शन दैनिकातून प्रसिद्ध करत आहोत.) ‘भावजागृती होण्यासाठी प्रयत्न करणे’, हे या प्रकियेला साहाय्यक तत्त्व आहे. त्यामुळे साधक मृत्यूसारख्या प्रसंगालाही सकारात्मक राहून हसतमुखाने सामोरा जाऊ शकतो. हे केवळ गुरुदेवांनी भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधकांना भावजागृतीसाठी करायला सांगितलेल्या प्रयत्नांमुळे आणि स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रकिया राबवल्यामुळेच शक्य आहे. गुरुदेवांनी सांगितलेली ही प्रक्रिया वैयक्तिक जीवनात, तसेच समष्टीत ईश्वरी राज्य आणू शकते, म्हणजेच साधकाची आध्यात्मिक उन्नती आणि समाजाची सर्वांगीण प्रगती करू शकते.
२ ई. गुरुदेवांच्या कृपेमुळे साधक रहात असलेली ठिकाणे आश्रमासमान होणे : प.पू. गुरुदेवांचा खरा साधक ज्या ठिकाणी राहील, त्या ठिकाणी सनातन आश्रम निर्माण करू शकतो. असे साधक घडवण्याची पद्धत गुरुदेवांनी अवलंबली आहे, उदा. साधक हिंदु धर्मजागृती सभा, गुरुपौर्णिमा इत्यादी सोहळ्यानिमित्त ज्या ठिकाणी निवास करतात, तिथे तात्पुरता सनातन आश्रम निर्माण होतो; म्हणूनच सनातनच्या साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी योगेश कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (२४.४.२०२५)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !