
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्य देशातील पहिले ‘अत्यंत गरिबीमुक्त’ राज्य झाले आहे, अशी घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी विधानसभेत केली.
१. राज्यातील अत्यंत गरिबी दूर करण्यासाठी विजयन् सरकारने वर्ष २०२१ मध्ये ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्प’ चालू केला. या कार्यक्रमांतर्गत ६४ सहस्र ६ कुटुंबांची ओळख पटवण्यात आली. गेल्या वर्षांत या कुटुंबांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे.
२. या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा फसवा असल्याचे सांगत विरोधकांनी सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानसभेचे विशेष अधिवेशन प्रारंभ होताच सर्व विरोधी आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.
३. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतांना मुख्यमंत्री विजयन् म्हणाले की, आम्ही केवळ तेच बोलतो जे आम्ही कार्यवाहीत आणू शकतो. आम्ही जे सांगितले, ते आम्ही कार्यवाहीत आणले आहे. हे आमचे विरोधी पक्षनेत्यांना उत्तर आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक