महाराष्ट्र आणि अन्य शहरांमध्ये मोठ्या आतंकवादी आक्रमणाचा कट !

पुणे – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) ‘अल-कायदा’ या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून कोंढवा येथे रहाणार्या जुबेर हंगरगेकर या संगणक अभियंत्याला अटक केली आहे. चेन्नईहून परतताच त्याला पुणे रेल्वेस्थानक परिसरातून कह्यात घेण्यात आले. या वेळी त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वेस्थानकावरून चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. जुबेरकडे कुख्यात आतंकवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. ‘अल् कायदा इन्स्पायर’ मासिकातील ‘एके ४७’ रायफलने गोळीबार करण्याची आणि बाँब सिद्ध करण्याच्या पद्धतीची छायाचित्रे अन् माहिती आढळून आली आहे. न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, जुबेर हा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता आणि महाराष्ट्र अन् अन्य शहरांमध्ये आतंकवादी आक्रमणाची योजना आखत होता.
🚨 Al-Qaeda-linked engineer arrested in Pune
🕵️♂️ ATS arrested Zuber Hangargekar from Kondhwa after return from Chennai
💣 Laden’s Urdu speech and Al-Qaeda Inspire manuals on AK47 use and bomb-making found
⚠️ Planned major terror attacks in Maharashtra and other Indian cities… pic.twitter.com/pNbfQlaR1J
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2025
१. जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत ? त्याने आणखी कुणाला अल् कायदाचे सदस्य होण्यासाठी माहिती दिली आहे का ? याचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडून केले जात आहे. जुबेर मूळचा सोलापूरचा असून तो उच्चशिक्षित आहे. तो माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असून लाखो रुपयांचे वेतन घेतो.
२. ९ ऑक्टोबरला शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईच्या वेळी १९ भ्रमणसंगणक आणि ४० भ्रमणभाष जप्त करण्यात आले. अन्वेषणाच्या वेळी जुबेर हंगरगेकरच्या भ्रमणसंगणकामध्ये अल्-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य ‘डाऊनलोड’ केलेले आढळले. असे साहित्य ‘डाऊनलोड’ करणे, हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. जप्त केलेल्या सर्व उपकरणांचे सध्या ‘डिजिटल फॉरेन्सिक’ अन्वेषण चालू असून त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका
|
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान