अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ (आयात शुल्क) धोरणाच्या कालावधीत आज-काल देशात स्वदेशी तंत्रज्ञानाविषयी वादविवाद वाढत आहेत. अनेक प्रमुख व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी आता ‘गूगल’ अन् ‘मायक्रोसॉफ्ट’ यांसारख्या अमेरिकन आस्थापनांकडून प्रदान केलेल्या सेवांऐवजी स्वदेशी आस्थापन ‘झोहो’च्या उत्पादनांकडे वळत आहेत. ही स्वदेशी ‘ई-मेल’ सेवा वेगाने ‘गूगल’च्या ‘जीमेल’ला पर्याय बनत आहे. जर तुम्ही ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘जीमेल’ किंवा ‘झूम मिटिंग्ज’ यांसारख्या साधनांना पर्याय शोधत असाल, तर स्वदेशी आस्थापन ‘झोहो’ हा एक चांगला पर्याय कसा असू शकतो, ते येथे दिले आहे.

१. ‘झोहो मेल’ हे ‘जीमेल’, ‘आऊटलुक’चे उत्तर
सध्या भारतात सर्वांत लोकप्रिय सेवा, म्हणजे ‘गूगल’चे ‘जीमेल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे ‘आऊटलुक’. यांचा स्थानिक पर्याय, म्हणजे ‘झोहो मेल’. हे नवीन वैशिष्ट्य नाही; परंतु ‘झोहो मेल’ गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.
१ अ. विनामूल्य ‘ई-मेल’ सिद्ध करणे सोपे ! : ‘mail.zoho.in’ या संकेतस्थळाला भेट द्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक ई-मेलसाठी पर्याय आहेत. खाते सिद्ध करण्यासाठी तुमची माहिती प्रविष्ट करा. तुम्ही हा ‘ई-मेल’ भ्रमणभाष आणि संगणक या दोन्हींवर वापरू शकता.
१ आ. ‘झोहो मेल’ लोकांची पसंती का बनत आहे ?
१. गोपनीयतेवर भर : ‘डेटा ट्रॅकिंग’ आणि विज्ञापने यांपासून मुक्त, एक सुरक्षित अनुभव.
२. विज्ञापनांविना : ‘जीमेल’सारखी विज्ञापने नाहीत, ‘क्लीन इंटरफेस’ (सहजपणे हाताळता येणारे).
३. ‘कस्टम डोमेन’ : वैयक्तिककृत ई-मेल आयडी (उदा. [email protected]).
४. व्यावसायिक साधने : संपर्क, कॅलेंडर (दिनदर्शिका) आणि ‘झोहो वर्कप्लेस’सह सोपे टीमवर्क.
५. परवडणारे : अल्प किमतीत व्यावसायिक वैशिष्ट्ये.
६. प्रत्येक उपकरणांवर (‘डिव्हाईस’वर) उपलब्ध : वेब, भ्रमणभाष आणि ‘IMAP/SMTP ॲक्सेस.’

२. ‘गूगल ड्राईव्ह’ऐवजी ‘झोहो वर्कड्राईव्ह’
हा एक स्वस्त पर्याय आहे. ‘झोहो वर्कड्राईव्ह’ची प्रारंभीची योजना (स्टार्टर प्लॅन) १७० रुपयांपासून चालू होते आणि १ ‘टीबी’ (टेट्राबाईट) साठवणूक क्षमता (स्टोरेज) देतो. जर तुम्ही विनामूल्य वापरकर्ता असाल, तर झोहो ५ ‘जीबी’ (गीगाबाईट) विनामूल्य ‘स्टोरेज’ देते.
‘झोहो’कडे पैसे देऊन साठवणुकीची क्षमता (‘पेड प्लॅन’मध्ये) घेण्याचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत. ‘zoho.com/workdrive/’वर जा. जर तुम्हाला अतिरिक्त ‘स्टोरेज’ची आवश्यकता असेल, तर तुम्हाला आवडणारा प्लॅन निवडा. ‘पेड प्लॅन’मध्ये ‘गूगल’पेक्षा स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत .

३. ‘अरट्टाई’ची ‘व्हॉट्सॲप’शी स्पर्धा
यात ‘व्हॉट्सॲप’ची जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये आहेत. संदेश पाठवणे, व्हिडिओ कॉल (ध्वनीचित्र संपर्क), संपर्कासाठी वैशिष्ट्ये इत्यादी. मनोरंजक म्हणजे वापरकर्ते बैठकांचे वेळापत्रकही नियोजित करू शकतात, जे त्वरित शक्य आहे.
महत्त्वाचे म्हणजे ‘गूगल प्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपल स्टोअर’ यांवरून ‘अरट्टाई’ ‘डाऊनलोड’ करा. तुम्ही ‘व्हॉट्सॲप’प्रमाणेच त्यावर खाते सिद्ध करू शकता. त्याचे १ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.

४. ‘झूम मिटिंग्ज’ऐवजी ‘झोहो मिटिंग्ज’
‘झोहो मिटिंग्ज’ हे ‘ऑनलाईन’ बैठकांसाठी ‘झूम’ आणि ‘गूगल’ यांच्यासाठीचा पर्याय आहे. ‘झूम’ ४० मिनिटांपर्यंत बैठकांसाठी विनामूल्य वेळ देते, तर ‘झोहो’ ६० मिनिटांपर्यंत बैठकांसाठी विनामूल्य वेळ देते.
‘झूम मिटिंग्ज’पेक्षा ‘झोहो मिटिंग्ज’ स्वस्त आहे. ‘zoho.com/meeting/’वर जा आणि बैठकांसाठीचे वेळापत्रक करायला प्रारंभ करा. सशुल्क प्लॅनही उपलब्ध आहेत, ज्याची किंमत ‘झूम’च्या निम्मी आहे.
५. …हे ‘झोहो टूल्स’ही जाणून घ्या…!
अ. ‘झोहो फॉर्म्स’ : ‘गूगल फॉर्म्स’चा एक भारतीय पर्याय. तुम्ही सर्वेक्षण किंवा अभिप्राय फॉर्म सिद्ध करू शकता.
आ. ‘झोहो कॅलेंडर’ : बैठका आणि कार्यक्रम यांचे वेळापत्रक सिद्ध करण्यासाठी.

इ. ‘झोहो नोटबुक’ : ‘गूगल कीप’ किंवा ‘एव्हरनोट’ यांसारखेच एक मूळ ‘नोट-सेव्हिंग टूल’. तुम्ही लिखाण, ‘ऑडिओ’ (ध्वनीमुद्रिका), प्रतिमा आणि अगदी रेखाचित्रेही यावर जतन करू शकता.
ई. ‘उला ब्राऊझर’ : ‘गूगल क्रोम’ किंवा मायक्रोसॉफ्टचा घरगुती पर्याय.
उ. ‘अरट्टाई’ लवकरच वापरकर्त्यांसाठी ‘पेमेंट सिस्टम’ (पैसे देण्याची सुविधा) सादर करणार आहे.
६. काही प्रश्नांची उत्तरे
अ. प्रश्न : लोक स्वदेशी तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतील का ?
उत्तर : आज १० लाखांहून अधिक संस्था ‘झोहो’च्या उत्पादनांचा वापर करतात. याचे मॉडेल लाभदायी आणि विश्वासार्ह आहे. ‘क्लाउड स्टोरेज’मध्ये (मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर साठवणुकीची जागा) ‘गूगल’च्या आधी ‘झोहो वर्कड्राईव्ह लाँच’ करण्यात आले होते.
आ. प्रश्न : लोक ‘व्हॉट्सॲप’वरून ‘अरट्टाई’कडे का वळतील ? त्यात काय खास आहे ?
उत्तर : ‘अरट्टाई’ने संदेश देवाण-घेवाणीमध्ये नुकताच प्रवेश केलेला नाही. वर्ष २००६ मध्ये ‘झोहो क्लिक’ हा ‘मेसेजिंग प्लॅटफॉर्म लाँच’ केला. हा प्लॅटफॉर्म विज्ञापनांविना राहील. नवीन वैशिष्ट्ये जोडली जातील.
इ. प्रश्न : ‘झोहो वर्कप्लेस’ हा स्वस्त पर्याय आहे का ?
उत्तर : जर ‘झोहो इकोसिस्टम’चा वापर केला, तर तो इतर आस्थापनांपेक्षा अनेक गोष्टींमध्ये स्वस्त पर्याय आहे.
ई. प्रश्न : वापरकर्ते गूगल-मायक्रोसॉफ्ट यांवरून ‘झोहो प्लॅटफॉर्म’वर का गेले ?
उत्तर : ‘झोहो’ कोणताही प्लॅटफॉर्म सोडून त्यांना स्वीकारण्याचा सल्ला देत नाही. ‘झोहो’कडे मानवी संसाधनांपासून लेखन साधनांपर्यंत ५५ हून अधिक उत्पादने आहेत. ती एक संपूर्ण परिसंस्था आहे. ‘झोहो’ केवळ एक पर्याय नाही, तर नवीन उमेद करणारे आहे.
(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !