अफगाणिस्तानसह झालेल्या युद्धामुळे महागाईने गाठले टोक !

इस्लामाबाद – काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमेवर संघर्ष झाला. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. या दोन्ही देशांमधील सीमा बंद झाली आहे, त्यामुळे पाकिस्तानात महागाईचा वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोची किंमत ५ पटीने वाढली असून तो ६०० रुपये किलो आणि आले ७५० रुपये किलो दराने विकले जात आहे.
Tomatoes @ ₹600/kg, ginger ₹750/kg in Pakistan!
The ongoing war with Afghanistan is pushing inflation to extreme levels #AfghanistanPakistanWar
PC: @AsianChronicle pic.twitter.com/XREhOCx7fu— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 24, 2025
१. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ ऑक्टोबरपासून चालू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील २ सहस्र ६०० किलोमीटर सीमेवरील सर्व दारे बंद असून व्यापार थांबला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये फळे, भाज्या, खनिजे, औषधे, गहू, तांदूळ, साखर, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा व्यापार होतो.
२. काबुलमधील ‘पाकिस्तान-अफगाणिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स’चे प्रमुख खान जान अलोकझाई यांनी सांगितले की, व्यापार थांबल्यामुळे दोन्ही देशांना प्रतिदिन अनुमाने १० लाख डॉलर्सचे, म्हणजे ८ कोटी ८० लाख रुपयांची हानी झाली आहे. याआधी प्रतिदिन ५०० ट्रक भाज्यांची निर्यात केली जात होती, ती थांबली आहे. सध्या दोन्ही बाजूंच्या सीमांवर ५ सहस्र ट्रक इतका माल अडकला आहे. परिणामी टोमॅटो, सफरचंद आणि द्राक्षे या फळांचे भाव गगनाला भिडले आहेत.
३. रावळपिंडी येथील लहान भाजी विक्रेत्यांनी टोमॅटो, वाटाणे, आले आणि लसूण विकणे बंद केले आहे. लसूण प्रति किलो ४०० रुपये, तर कांदे १२० रुपये किलो या दराने विकले जात आहेत.
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan