हिंदु धर्माच्या अभ्यासिका मारिया विर्थ लिखित ‘व्हाय हिंदु धर्म इज अंडर अटॅक बाय मुस्लीम्स, ख्रिश्चनस् अँड द लेफ्ट’ या पुस्तकाचे समीक्षण !
‘व्हाय हिंदु धर्म इज अंडर अटॅक बाय मुस्लीम्स, ख्रिश्चनस् अँड द लेफ्ट’ (हिंदु धर्मावर मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी यांच्याकडून आक्रमण का केले जात आहे ?), या हिंदु धर्माच्या अभ्यासिका आणि जर्मन लेखिका मारिया विर्थ यांच्या पुस्तकाचे एका शब्दात पुनरावलोकन करायचे, तर ‘निर्विवाद’ असे आहे. जर त्यामुळे तुम्हाला या पुस्तकाची प्रत घ्यावी, असे वाटत नसेल, तर पुढील भाग वाचा.
पाकचे फिल्ड मार्शल जनरल असीम मुनीर यांनी आण्विक धमक्या देण्यास प्रारंभ केल्यानंतर काही दिवसांतच मला हे पुस्तक मिळाले, हे दैवी नियोजन आहे, असे मला वाटते. या माणसाने मुसलमान आणि हिंदु यांच्यात विसंगती असल्याने दोन राष्ट्रांच्या सिद्धांताचे सातत्याने समर्थन केले आहे. हे पुस्तक या विसंगतीचे (मला अतिशय सौम्य वाटणारा शब्द) सखोल परीक्षण करते आणि त्याविषयी सामान्य हिंदूंच्या उदासीनतेविषयी भाष्य करते.
मारिया विर्थ यांनी अनेक वर्षे लिहिलेल्या त्यांच्या निबंधांचा हा संग्रह केवळ हिंदूंना भेडसावणार्या वैचारिक शत्रूत्वावर टीका नाही, तर जगातील सर्वांत सखोल आणि चुकीची समजली जाणारी आध्यात्मिक परंपरा असलेल्या हिंदु धर्माचे भावपूर्ण समर्थन आहे. अंतर्निहित सर्वसमावेशकता आणि बौद्धिक सखोलता असूनही हिंदु धर्म (किंवा सनातन धर्म) अनेक आघाड्यांवरून सातत्याने होणार्या आक्रमणांचे लक्ष्य का बनला आहे, याचे एक ठोस उदाहरण या पुस्तकात दिले आहे.

१. प्रत्येक व्यक्तीला सत्याचा शोध घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि शोधण्याची अनुमती देणे, हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !
हिंदु धर्माला (मग तो अब्राहमिक असो किंवा राजकीय) विरोध करणार्या विचारसरणींना त्याचा धोका का वाटतो, हा या निबंधांचा वारंवार पुनरावृत्ती होणारा विषय आहे. ‘एकमेव सत्य’ असल्याचा दावा करणार्या विचारसरणी प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक मार्गावर देवत्व पहाणार्या जागतिक दृष्टीकोनाशी सहअस्तित्वासाठी संघर्ष करतील, हे स्वाभाविक आहे. ही हिंदु धर्माची सर्वांत मोठी शक्ती आणि कमकुवतपणासुद्धा आहे. हिंदु धर्माचे सामर्थ्य, म्हणजे हिंदू बाहेर जाऊन (नरकात जाण्याचा धोका किंवा स्वर्गाचे बक्षीस यांखाली) धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार नाहीत आणि कमकुवतपणा, म्हणजे आपण विरोधी विचारसरणींनाही ‘परिपूर्ण सत्याचा’ संभाव्य मार्ग म्हणून विचित्र आत्मत्यागी पद्धतीने स्वीकारतो. हिंदु धर्म प्रत्येक व्यक्तीला सत्याचा शोध घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि शोधण्याची अनुमती देतो. याच कारणामुळे तो स्वतःवरील आक्रमणाचा सामना करत आहे.

२. पाश्चिमात्य शिक्षण, स्वतःच्या धर्माकडे दुर्लक्ष आणि हिंदु ग्रंथांची विर्पयास करणारी भाषांतरे यांमुळे हिंदु धर्मापासून दूर जाणारे आधुनिक हिंदू !

आधुनिक हिंदूंच्या स्थितीविषयी विर्थ यांच्या वेदनांनी मला प्रभावित केले. हिंदू त्यांच्या स्वतःच्या धर्मापासून अलिप्त झाले आहेत, याविषयी त्या एका पाठोपाठ एक असलेल्या प्रकरणांतून शोक व्यक्त करतात. यासाठी पुष्कळ कारणे आहेत. त्यांपैकी निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष, पाश्चिमात्य शिक्षण, हिंदु ग्रंथांची परंपरांचा विपर्यास करणारी आणि वसाहतवादी पूर्वग्रहाने भरलेली द्वेषपूर्ण भाषांतरे ही कारणे आहेत. मला खरोखर लाज वाटली की, एक बाहेरील व्यक्ती (ती खरोखरच बाहेरील व्यक्ती आहे का ? तिने भारतातील नामधारी हिंदूंपेक्षा हिंदु धर्म स्वीकारल्याचे दिसते; पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो !) पुन्हा शोधते, बचाव करते आणि हिंदु धर्माचे प्रतिनिधीत्वही करते ! तरीही तिचा सूर कधीही आरोप करणारा नसतो; तो दयाळू असतो; कारण एक आई चुकलेल्या मुलाला हळूवारपणे सुधारते; पण संदेश स्पष्ट आहे, ‘हिंदूंनी त्यांचा आध्यात्मिक वारसा परत मिळवला पाहिजे, त्यांचे धर्मग्रंथ वाचले पाहिजेत आणि त्यात अंतर्भूत असलेले सार्वभौमत्व समजून घेतले पाहिजे.’
३. समस्त हिंदूंनी या पुस्तकाचा काळजीपूर्वक अभ्यास करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक !
हे पुस्तक अवश्य वाचावे, असे आहे. विशेषतः जे हिंदू ‘हिंदु धर्म सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तो येथेच रहाणार आहे’, याचे यामागचे कारण न ओळखता दावा करतात, त्यांनी हे पुस्तक वाचावे. त्यासाठी आंधळेपणाने असलेला अभिमान नव्हे, तर काळजीपूर्वक अभ्यास आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे. ‘हिंदु धर्मातील कमतरता’, असे शीर्षक असलेले एक प्रकरणही या ग्रंथात आहे. ‘या पुस्तकातील काही प्रकरणांची ओळख महाविद्यालयांमधील तरुणांना करून दिली पाहिजे’, असे माझे प्रामाणिक मत आहे. वैचारिक गोंधळाच्या या सामाजिक माध्यमांच्या युगात मारिया विर्थ यांचे पुस्तक एक जागृती करणारा संदेश आहे. हिंदु धर्म जगाला देऊ करत असलेल्या सभ्यतेचे मूल्य ओळखण्याची ही वेळ आहे.
लेखक : श्री. अभिषेक पै, मंगळुरू, कर्नाटक.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !