रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. शशांक चोवटी, हुब्बळ्ळी, कर्नाटक.

अ. ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर मला ‘सुरक्षित जीवन जगण्यासाठी काय करायला हवे ?’, हे शिकायला मिळाले आणि ‘आवश्यक ते पालट करून सकारात्मक अन् सुरक्षित जीवन जगता येते’, याची जाणीव झाली.’

२. श्री. शांतकुमार, कलबुर्गी, कर्नाटक.

अ. ‘प्रदर्शन पाहिल्यावर मी अंतर्मुख झालो.

आ. येथे मला देव आणि अनिष्ट शक्ती यांच्याविषयी नवीन सूत्रे समजली.’

३. श्री. सुप्रीत एन्.एस्., दावणगेरे, कर्नाटक.

अ. ‘हे प्रदर्शन अद्भुत आहे.

आ. येथे मला पुष्कळ सकारात्मक वाटले.’

४. श्री. मयूर डी.एम्., बेंगळुरू, कर्नाटक.

अ. ‘प्रदर्शन पाहून मी निःशब्द झालो.

आ. ‘अध्यात्मामध्येही अशा प्रकारचे संशोधन करता येते’, हे मला ठाऊक नव्हते.’

५. श्री. हर्षिल आर्या जे.एस्., मंड्या, कर्नाटक. 

अ. ‘हे प्रदर्शन पाहून मी अचंबित झालो.

आ. येथे येण्यापूर्वी माझ्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती यांविषयी पुष्कळ गोंधळ होता; पण तो आता संपला आहे. हे प्रदर्शन पाहिल्यावर मला याविषयीची बरीच सूत्रे समजली आहेत.’

६. श्री. राजू काडकल, बेंगळुरू

अ. ‘प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

आ. ‘हे प्रदर्शन म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचा स्पर्श आहे’, असे मला वाटले.’

७. श्री. श्रीधर, बेंगळुरू

अ. ‘अनिष्ट शक्तींविषयी सखोल संशोधन करणार्‍या साधकांचे मला पुष्कळ कौतुक वाटले. अनिष्ट शक्तींच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.’

८. श्री. मनोज ए., बेंगळुरू

अ. ‘यापूर्वी मला चैतन्य, सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती यांविषयी काहीही ठाऊक नव्हते; मात्र ‘साधना केल्यामुळे या सर्वांविषयी समजू लागते’, हे प्रदर्शन पहातांना मला समजले.’

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.